मुंबई, 19 मे: अॅमेझॉन प्राइमवरील ‘द फॅमिली मॅन’ (The Family Man) या वेब सीरीजला (Web series) चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मनोज वाजपेयी (Manoj Bajpai) यांनी साकारलेली मुख्य भुमिका चर्चेचा विषय ठरली होती. अगदी पहिला भाग प्रदर्शित झाल्यापासून चाहते या वेब सीरीजच्या दुसऱ्या भागाची वाट पाहात होते. मध्यतंरी या वेब सीरीजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर (Release date) करण्यात आली होती. पण सैफ अली खानच्या (Saif Ali khan) ‘तांडव’ या वेब सीरीजमुळे (Tandav Web series) देशात बराच वादंग उठला होता. याच पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी ‘द फॅमिली मॅन-2’ च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती.
मागील दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या या वेब सीरीजचा दुसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी या वेब सीरीजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून 4 जूनला हा सीझन पाहायला मिळणार आहे. ‘द फॅमिली मॅन’ च्या पहिल्या सीझनमध्ये मुख्य भूमिकेत असणाऱ्या श्रीकांत तिवारी अर्थात मनोज वायपेयीनं अनेकांची मनं जिंकली होती. अनेकांनी त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. चाहत्यांची उत्कंठा वाढवणाऱ्या या नवीन सीझनमध्ये अनेक नवीन चेहरे दिसणार आहे. दक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा अक्कीनेनीही यात व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. 9 एपिसोडच्या या सीझनमध्ये नेमकं काय होणार? समंथाची भूमिका नेमकी काय असणार याबाबत चाहते आत्तापासूनच उत्सुक आहेत.
**हे ही वाचा-** ‘तांडव’ला सर्वोच्च न्यायालयाचा फटका; अॅमेझॉन प्राईमला मागावी लागली माफी या थ्रिलर सिरीजच्या 9 भागांच्या नवीन सीझनमध्ये श्रीकांत मध्यमवर्गीय फॅमिली मॅन आणि जागतिक दर्जाचा गुप्तचर अशी दुहेरी भूमिका साकारणार आहे. यावेळीही मनोज वायपेयी देशावर होणारा घातक हल्ला परतवून लावताना दिसणार आहे. रोमांचक ट्विस्ट्स आणि अनपेक्षित क्लायमॅक्सनं परिपूर्ण असणाऱ्या या अॅक्शन-ड्रामा सिरीजचा आगामी सीझन श्रीकांतची दुहेरी भूमिका लक्षवेधक ठरेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. हे ही वाचा- बाह्य जगापासून अलिप्त राहणार मनोज वाजपेयी, अंडरग्राउंड राहण्यामागे आहे हे कारण अलीकडेच अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’ या वेब सीरीजनं देशातील राजकीय वातावरण ढवळून काढलं होतं. त्याच दरम्यान या वेब सीरीजच्या प्रसिद्धीची तारीख जवळ आली होती. पण तांडव वेब सीरीजमुळे निर्माण झालेल्या वादाचा फटका ‘द फॅमिली मॅन’ च्या दुसऱ्या सीझनला बसण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे या वेब सीरीजच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर टाकण्यात आली होती.