• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • कौतुकास्पद! 'हा' मराठी अभिनेता लग्न रद्द करून, होणाऱ्या पत्नीसोबत करतोय रुग्णसेवा

कौतुकास्पद! 'हा' मराठी अभिनेता लग्न रद्द करून, होणाऱ्या पत्नीसोबत करतोय रुग्णसेवा

अभिनेता सिद्धेश प्रभाकर लिंगायत (Siddhesh Prabhakar LIngayat) याने आपलं लग्नं पुढे ढकलून रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 मे : देशामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत चालला आहे. लोकांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कित्येक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होतं आहे. सर्वात जास्त रुग्णसंख्या महाराष्ट्रात आढळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय घेण्यात आला आहे. असं असलं तरी अनेक कलाकार लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. तर काही कलाकारांनी जबाबदारी दाखवत आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. तर एका असाही मराठी कलाकार आहे, ज्याने आपलं लग्न फक्त पुढेच ढकललं नाही, तर आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत तो कोरोना रुग्णांची सेवा करत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@siddhesh_lingayat_)

  मराठी अभिनेता सिद्धेश प्रभाकर लिंगायत (Siddhesh Prabhakar LIngayat) असं त्याचं नाव आहे. सिद्धेशचं लग्न याच काळात होणार होतं. मात्र सध्याची परिस्थिती बघून त्याने आपलं लग्नं पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धेशनं आपल्या आयुष्यात विविध संकटांना तोंड दिलं आहे. त्याने अनेक कठीण प्रसंग आपल्या आयुष्यात बघितले आहेत. त्यामुळे त्याला सध्याच्या परिस्थितीची जाणीव आहे आणि म्हणूनच त्याने या काळात खाजगी आयुष्यात आनंद व्यक्त करण्याऐवजी समाजसेवेचा विडा उचलला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@siddhesh_lingayat_)

  सिद्धेशच्या या निर्णयाचं सर्वत्रचं कौतुक केलं जात आहे. सिद्धेश सोबतचं त्याची होणारी पत्नी महेश्वरीचा सुद्धा यात मोठा वाटा आहे. त्याला महेश्वरीनं यात मोलाची साथ दिली आहे. सध्या हे दोघे मिळून रुग्णांची सेवा करत आहेत. (हे वाचा: CIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया ) सिद्धेशने बारायण, खारी बिस्कीट, टाईमपास 2, उनाड यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे. तसंच सिद्धेशने लक्ष, जागो मोहन प्यारे, एक नंबर, प्रीती परी तुझवरी यांसारख्या मालिकांत सुद्धा काम केलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: