जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / नेहमी पुढे..पुढे बोलणाऱ्या कपिल शर्माची मौसमी चॅटर्जी यांनी कोली बोलती बंद, कृष्णा-अभिषेक देखील झाले नतमस्तक

नेहमी पुढे..पुढे बोलणाऱ्या कपिल शर्माची मौसमी चॅटर्जी यांनी कोली बोलती बंद, कृष्णा-अभिषेक देखील झाले नतमस्तक

टीव्हीवरचा सर्वांत लोकप्रिय कार्यक्रम 'द कपिल शर्मा शो' शेवटच्या टप्प्यावर आहे.

टीव्हीवरचा सर्वांत लोकप्रिय कार्यक्रम 'द कपिल शर्मा शो' शेवटच्या टप्प्यावर आहे.

टीव्हीवरचा सर्वांत लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ शेवटच्या टप्प्यावर आहे. मात्र, शो संपण्यापूर्वी बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री मौसमी चॅटर्जी आणि रीना रॉय या शोमध्ये पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 जून : टीव्हीवरचा सर्वांत लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ शेवटच्या टप्प्यावर आहे. शो संपताच, सर्व प्रथम कपिल शर्मा त्याच्या संपूर्ण टीमसह परदेशात जाणार आहे. कृष्णा अभिषेक आणि भारती सिंग, सुमोना चक्रवर्ती आणि किकू शारदा यांच्यासह कपिल अमेरिकेला जाणार आहे आणि परत आल्यानंतर शो पुन्हा सुरू करणार आहे. मात्र, शो संपण्यापूर्वी बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री मौसमी चॅटर्जी आणि रीना रॉय या शोमध्ये पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. शोचा एक प्रोमो समोर आला आहे, जो पाहून कपिल शर्माचे चाहते खूप खूश आहेत. मात्र, मौसमीच्या वागण्या-बोलण्यामुळे शोचे कॉमेडियन कॉमेडी करायला विसरले. नेमकं असं काय झालं..याबद्दलच आपण जाणून घेणार आहे. रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये, मौसमी चॅटर्जी आणि रीना रॉय कपिल शर्माच्या शोमध्ये एकदम ढासू स्टाईलमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. या दरम्यान रीना फक्त हसताना दिसत आहे पण मौसमी चॅटर्जी यांची विनोदबुद्धी यामुळे सेटवर बसलेले लोक हसायला भाग पडतात. दुसरीकडे, सेटवर कॉमेडी करणारे किकू आणि कृष्णा, मौसमी यांच्या हजरजबाबीपणाला थक्क झाले आहेत. दोघेही हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहतात तर कपिल शर्माही त्यांच्यापुढे पराभव स्वीकारतो आणि त्याला सेटमधून बाहेर काढण्याविषयी बोलतो. या सर्व गोष्टी अतिशय मजेशीर पद्धतीने दाखविण्यात आल्या आहेत, ज्याला पाहून प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. वाचा- फाइट सीन करताना अपघात; साऊथचा प्रसिद्ध अभिनेता रुग्णालयात दाखल रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये कपिलने मौसमी चॅटर्जी आणि रीना रॉय यांना प्रश्न विचारल्याचे आणि मौसमी उत्तरे देत असल्याचे दिसून येते. कपिल म्हणतो, ‘रोमँटिक सीन करतान कोण जास्त लाजते? कपिलच्या या प्रश्नाला उत्तर देताना मौसमी म्हणते की ‘ज्याला येत नाही ते’. कपिल पुढे विचारतो की सेटवर कोण जास्त फ्लर्ट करते, यावळी मौसमी या ‘मी’ म्हणतात. मौसमी यांची उत्तरं ऐकून कपिल आणि रीना रॉय हसायला लागतात.

News18लोकमत
News18लोकमत

पुढे, मौसमी यांच्या बुद्धीचे कौतुक करताना कपिल म्हणतो की, मला मात्र खूप मज्जा येत आहे. यावर मौसमी त्याला फटकारते आणि म्हणते, ‘तुला खूप आनंत होतोय ना? पहिले तर तू उशिरा आलास आणि मी विचारले कुठे आहे तो, तेव्हा सांगातायत तो वाचतोय म्हणून….तेव्हा मी म्हटलं की आम्ही कलाकार आहोत, मग तो काय वाचतोय. मौसमीचं हे बोलणं ऐकून कपिल अवाक होतो, पण नंतर त्याला हसू आवरता आलं नाही. या सगळ्यामध्ये, शोमध्ये किकू शारदाची एंट्री होते आणि तो खिन्नपणे ’ सगळं विसरलं असं’ म्हणतो. किकूची प्रतिक्रिया पाहून मौसमी हसायला लागते.

किकूनंतर, कृष्णा अभिषेकची एंट्री होती आणि तो जितेंद्र यांची नक्कल करतो. तो रीना रॉयच्या समोर येतो आणि असे काही बोलतो की स्वतः मौसमी त्याची बोलतीच बंद करतात. मौसमी यांचे बोलणे ऐकून कृष्ण जमिनीवर पडून तिच्या पायाला स्पर्श करू लागतो. दरम्यान, कपिल गमतीने सांगतो की, ‘मौसमी जी, आम्ही इथेही सेट बनवला आहे, मी तुम्हाला दाखवतो.’ कपिलचे बोलणे ऐकून सगळे हसायला लागतात, मौसमी या देखील जोरात हसायला लागतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात