मुंबई, 26 जून : मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पृथ्वीराज त्याच्या अपकमिंग विलायथ बुद्ध सिनेमाच्या शुटींगमध्ये बिझी आहे. दरम्यान सिनेमाचं शुटींग करत असताना पृथ्वीराजचा अपघात झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या पायावर की होल्डर सर्जरी करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातानंतर सिनेमाचं शुटींग थांबवलं असून अभिनेता व्यवस्थित बरा होईपर्यंत वाट पाहण्यात येणार आहे. या गंभीर दुखापतीनंतर अभिनेत्याला काही महिन्यांच्या सक्ती सुट्टीवर जावं लागेल असं म्हटलं जातंय. अभिनेता पृथ्वीराज विलायथ बुद्ध सिनेमाच्या सेटवर एक इंटेंस फाइट सीन शुट करत होता. सीन दरम्यान त्याच्या अपघात झाला. सिनेमाचं शुटींग हे मरयूर येथे सुरू होतं. अभिनेत्याचा अपघात होताच सेटवरील सगळा क्रू घाबरला. पृथ्वीराजला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या पायाची सर्जरी करण्याचा सल्ला दिलाय. आज त्याची सर्जरी होणार असून पुढील काही दिवस किंवा महिने त्याला सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितली आहे. जवळपास 2-3 महिने त्याला कामातून ब्रेक घ्यावा लागेल असं सांगितलं जातंय.
Leading actor #PrithvirajSukumaran met with an accident on location of
— Sreedhar Pillai (@sri50) June 25, 2023
his #VilayathBuddha in Marayur while shooting an action scene on Sunday. Today he will undergo a keyhole surgery on his leg at a private hospital in Kochi. He is expected to take a complete rest for a few… pic.twitter.com/9qnBkWMSeu
अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनच्या वर्क फ्रंट विषयी सांगायचं झालं तर त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमधील आदुजीविथम हा सिनेमा महत्त्वाचा ठरला. सिनेमाच्या ट्रेलरनंतर सिनेमा ऑनलाइन लिक झाला होता. ज्यामुळे मेकर्सचा मोठा तोडा झाला होता.
पृथ्वीराज येणाऱ्या काळात बडे मिया छोटे मिया या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफबरोबर तो दिसणार आहे. सिनेमात पृथ्वीराज कबीर हे निगेटीव्ह पात्र साकारणार आहे. त्याचप्रमाणे पृथ्वाराज अभिनेता मोहनलाल यांच्या बहुचर्चित एल2: एमपुरान सिनेमातही दिसणार आहे. पृथ्वीराज स्वत: या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.