मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /हिस्ट्री TV18 च्या कोविड-19 लशीवरील माहितीपटात दिसणार मनोज बाजपेयी; म्हणाले, 'हा माझा श्रद्धांजली वाहण्याचा...'

हिस्ट्री TV18 च्या कोविड-19 लशीवरील माहितीपटात दिसणार मनोज बाजपेयी; म्हणाले, 'हा माझा श्रद्धांजली वाहण्याचा...'

कोविड-19 लशीवरील माहितीपटात दिसणार मनोज बाजपेयी

कोविड-19 लशीवरील माहितीपटात दिसणार मनोज बाजपेयी

हिस्ट्री टीव्ही 18 वर 'द व्हायल - इंडियाज व्हॅक्सिन स्टोरी' या नावाची डॉक्युमेंटरी लवकरच येणार आहेत. या डॉक्युमेंटरीमध्ये मनोज बाजपेयी दिसणार आहेत. त्यांचा या माहितीपटात काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल अभिनेत्याने आपलं मत व्यक्त केलं आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 मार्च :  अभिनेता मनोज बाजपेयी हे लवकरच एका नव्या कोऱ्या भूमिकेत झळकणार आहेत. हिस्ट्री टीव्ही 18 वर  'द व्हायल - इंडियाज व्हॅक्सिन स्टोरी' या नावाची डॉक्युमेंटरी लवकरच येणार आहेत. या डॉक्युमेंटरीमध्ये मनोज बाजपेयी दिसणार आहेत.  या नवीन डॉक्युमेंटरी 'द व्हायल - इंडियाज व्हॅक्सिन स्टोरी' ला मनोज वाजपेयींनी आवाज दिला आहे. भारताचा कोविड-19 लसीचा अविश्वसनीय प्रवास या माहितीपटाद्वारे सांगण्यात आला आहे. बाजपेयींनी हा माहितीपट कथन करताना अक्षरशः जिवंत केला आहे. त्यांचा या माहितीपटात काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल अभिनेत्याने आपलं मत व्यक्त केलं आहे.

यावेळी बोलताना पद्मश्री मनोज बाजपेयी म्हणाले, 'निर्मात्यांना मी या प्रकल्पाचा एक भाग असावा असे वाटत होते. तसेच माझ्यासाठी यात काम करणे म्हणजे फ्रंटलाइन कामगार आणि इतर ज्यांनी या महामारीमध्ये इतरांना वाचवण्यासाठी आपला जीव पणाला लावला त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा माझा मार्ग होता. लक्षात ठेवा आम्ही सर्वजण आपापल्या घरात आरामात होतो, पण बाहेर काम करणारे हजारो लोक होते. पडद्यामागे काम करणारे लोक आहेत. अनेक शास्त्रज्ञ, आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले. हा माहितीपट त्यांच्या योगदानाचा गौरव करतो.' असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Rakhi Sawant: हिजाब घातला, रोजा ठेवला; संतापलेले नेटकरी राखीला म्हणाले 'कधी 16 सोमवारचं व्रत पण...'

मनोज बाजपेयी यांनी माहितीपटाचे रेकॉर्डिंग अवघ्या दोन दिवसांत पूर्ण केले. डॉक्युमेंटरीसाठी निवेदकाची भूमिका बजावल्याने हे वाटतं तितकं सोपं नव्हतं, असं ते म्हणाले आहेत. मला ही माहिती अतिशय सोप्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहचवायची होती आणि ते माझ्यासाठी एक कठीण टास्क होते असं ते म्हणाले आहेत.

अभिनेत्याने सांगितले की भारताच्या लसीची कथा बहुआयामी आहे. हे यश आणि आव्हान दोन्हीही होते. परंतु लोकांनी आव्हानांचा सामना केला आणि लसीकरण यशस्वी केले. 1.3 अब्ज भारतीयांना त्याचा फायदा झाला. ते म्हणाले, 'आपण जनतेचे आभार मानले पाहिजेत. बहुतेक लोक लसीकरण करू इच्छित होते. त्यांना कोविड-19 संपवायचा होता.

'द व्हायल - इंडियाज व्हॅक्सिन स्टोरी'चा प्रीमियर शुक्रवारी रात्री ८ वाजता हिस्ट्री टीव्ही १८ वर होईल. यात अनेक ज्ञात नसलेल्या खऱ्या घडलेल्या घटनांचा  समावेश करण्यात आला आहे. डॉक्युमेंटरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यासह डॉ. सुमित अग्रवाल (शास्त्रज्ञ, ICMR), डॉ. शमिका रवी (सार्वजनिक धोरण तज्ञ), डॉ. देवी शेट्टी  आणि डॉ.कृष्णा एला (चेअरमन, भारत बायोटेक) यांचा समावेश आहे. शिवाय ही पहिलीच डॉक्युमेंट्री आहे, ज्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविड-19 सारख्या महामारीवर 'भारताचा विजय' याविषयी तपशीलवार चर्चा करताना दिसणार आहेत.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actor, Manoj Bajpayee