एनसीबीच्या ताब्यात असलेले मुनमुन धामेचा नुपूर सारिका इस्मीत सिंग मोहक जसवाल विक्रांत चोकर गोमित चोप्रा आर्यन खान अरबाज मर्चंट शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची चौकशी या कारवाईत बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. एनसीबीनं आर्यन खानलाही ताब्यात घेतलं असून त्याची सध्या चौकशी सुरु आहे. मात्र आपल्याला गेस्ट म्हणून बोलावलं असल्याचं आर्यन खाननं सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हेही वाचा- Cordelia क्रूझवर छापा, पहिली FIR दाखल; शाहरुख खानचा मुलगा ताब्यात NCB सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात क्रुझवरुन ताब्यात घेतलेल्या आर्यन खानचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आर्यन खाननं चौकशीत सांगितलं की, त्याला या क्रुझवर गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं आणि त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं मानधन देण्यात आलेलं नव्हतं. केवळ आपल्या नावाचा वापर करुन इतरांना बोलावण्यात आलं होतं. हेही वाचा- NCB च्या 'या'अधिकाऱ्यानं केलं Cordelia क्रूझवरील सीक्रेट ऑपरेशन एनसीबीनं दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, NCB मुंबईच्या अधिकाऱ्यांनी 02.10.2021 रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia क्रूझवर छापा टाकला. या ऑपरेशन दरम्यान MDMA/ एक्स्टसी, कोकेन, एमडी (Mephedrone) आणि चरस सारख्या विविध ड्रग्स जप्त करण्यात आले. यात एकूण 8 जणांना ताब्यात घेतलं असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. सध्या ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी एनसीबी मुंबईनं गुन्हा 94/21 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.#WATCH | Three women, all residents of Delhi, have been brought to Narcotics Control Bureau (NCB) office in Mumbai for questioning in connection with the raid on a rave party at a cruise off the Mumbai coast yesterday pic.twitter.com/DHfd4HL74n
— ANI (@ANI) October 3, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.