जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / शाहरुखचा मुलगा आर्यन खान NCB च्या ताब्यात, समोर आला पहिला Inside Video

शाहरुखचा मुलगा आर्यन खान NCB च्या ताब्यात, समोर आला पहिला Inside Video

शाहरुखचा मुलगा आर्यन खान NCB च्या ताब्यात, समोर आला पहिला Inside Video

Watch Video: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 ऑक्टोबर: मुंबईच्या समुद्रात एका क्रूझवर ( CRUISE SHIP) सुरू असलेल्या हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीचा एनसीबीने पर्दाफाश केला. NCB नं प्रवासी म्हणून मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या लक्झरी क्रूझ Cordelia मध्ये जाऊन सीक्रेट ऑपरेशन केलं. सुमारे 7 तास चाललेल्या छाप्यादरम्यान, एनसीबीनं (NCB) मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केली आहेत. एनसीबीनं यात एकूण 8 जणांना ताब्यात घेतलं असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. तसंच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. आर्यन खान सध्या NCB च्या ताब्यात आहे. त्याचा Inside Video समोर आला आहे.

जाहिरात

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची चौकशी या कारवाईत बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. एनसीबीनं आर्यन खानलाही ताब्यात घेतलं असून त्याची सध्या चौकशी सुरु आहे. मात्र आपल्याला गेस्ट म्हणून बोलावलं असल्याचं आर्यन खाननं सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हेही वाचा-  Cordelia क्रूझवर छापा, पहिली FIR दाखल; शाहरुख खानचा मुलगा ताब्यात   NCB सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात क्रुझवरुन ताब्यात घेतलेल्या आर्यन खानचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आर्यन खाननं चौकशीत सांगितलं की, त्याला या क्रुझवर गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं आणि त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं मानधन देण्यात आलेलं नव्हतं. केवळ आपल्या नावाचा वापर करुन इतरांना बोलावण्यात आलं होतं. या कारवाईनंतर NCB नं अधिकृत माहिती (Official Statement of NCB) दिली आहे. एनसीबीनं दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, NCB मुंबईच्या अधिकाऱ्यांनी 02.10.2021 रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia क्रूझवर छापा टाकला. या ऑपरेशन दरम्यान MDMA/ एक्स्टसी, कोकेन, एमडी (Mephedrone) आणि चरस सारख्या विविध ड्रग्स जप्त करण्यात आले. यात एकूण 8 जणांना ताब्यात घेतलं असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. सध्या ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी एनसीबी मुंबईनं गुन्हा 94/21 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात