जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Corona Lockdown: उत्तराखंडमध्ये अडकले मनोज वाजपेयी, दीपक डोबरियाल; अशी आहे परिस्थिती

Corona Lockdown: उत्तराखंडमध्ये अडकले मनोज वाजपेयी, दीपक डोबरियाल; अशी आहे परिस्थिती

Corona Lockdown: उत्तराखंडमध्ये अडकले मनोज वाजपेयी, दीपक डोबरियाल; अशी आहे परिस्थिती

अभिनेता मनोज वाजपेयी आणि दीपक डोबरियाल शूटिंगसाठी उत्तराखंडमध्ये गेले असतानाच लॉकडाऊनची घोषणा झाली. त्यामुळे गेल्या 3 आठवड्यांपासून ते त्याठिकाणीच अडकले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

उत्तराखंड, 12 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) नुकसान झालेल्या क्षेत्रांपैकी चित्रपट क्षेत्र एक महत्त्वाचे आहे.  अनेक चित्रपटांचे शूटिंग ठप्प झाले आहे तर तर अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सरकारकडून सर्व ट्रेन, गाड्या त्याचप्रमाणे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सही रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी आपल्या शहरातून देशातील विविध भागात गेलीली माणसं तिथेच अडकली आहे. 14 एप्रिलपर्यंत असणारा लॉकडाऊन महाराष्ट्रासह आणखी काही राज्यांमध्ये किमान 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. परिणामी या अडकलेल्या व्यक्तींना त्याठिकाणीच राहण्याशिवाय काही पर्याय देखील नाही आहे. (हे वाचा- रणवीरला झालाय गंभीर आजार, दीपिकाच्या सोशल मीडिया पोस्टमधून झाला खुलासा ) अशाच परिस्थितीत बॉलिवूडचे दोन प्रसिद्ध अभिनेते देखील अडकले आहेत. अभिनेता मनोज वाजपेयी आणि दीपक डोबरियाल या दोघांचे उत्तराखंडमध्ये एकाठिकाणी शूटिंग सुरू होते. मात्र शूटिंग सुरू होताच काही दिवसात कोरोना भारतात पोहोचला आणि बघता बघता लॉकडाऊनची घोषणा देखील झाली. मनोज, दीपक आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडे आपापल्या वास्तव्याच्या ठिकाणी पोहोचण्याचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. परिणामी गेल्या 3 आठवड्यांपासून ते सर्वजण त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. एका एंटरटेनमेट पोर्टलने याबाबत माहिती दिली आहे. सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याची माहिती मनोज वाजपेयींनी या पोर्टलला दिली असल्याचे समजते आहे. (हे वाचा- कोरोना पॉझिटिव्ह बॉलिवूड अभिनेत्रीचा अनुभव, डॉक्टरांबद्दल म्हणाली,‘शब्दच नाहीत’ ) दरम्यान मनोज वाजपेयी यांचे कुटुंबीय म्हणजेच त्यांची पत्नी आणि मुलगी त्यांच्याबरोबरच उत्तराखंडमध्ये आहेत. मात्र दीपक डोबरियाल यांची पत्नी आणि मुलं मुंबईत आहेत. त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग देखील थांबल्यामुळे सर्व क्रू मेंबर्सना तिथेच अडकून राहावं लागलं आहे. संपादन- जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात