Home /News /entertainment /

रणवीरला झालाय गंभीर आजार, दीपिकाच्या सोशल मीडिया पोस्टमधून झाला खुलासा

रणवीरला झालाय गंभीर आजार, दीपिकाच्या सोशल मीडिया पोस्टमधून झाला खुलासा

अभिनेता रणवीर सिंहला एक आजार असल्याचं समोर आलं आहे आणि याचा खुलासा दीपिकाच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमधून झाला आहे.

  मुंबई, 12 एप्रिल : कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण पाहता, महाराष्ट्रात लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात आलं आहे. राज्य सरकारनं सर्वांना घरी राहून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. अशात बॉलिवूड स्टार सुद्धा आपापल्या घरी आहेत. ते नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत आणि त्यांना घरी राहण्याचं आवाहन करताना दिसत आहे. अशात अभिनेता रणवीर सिंहला एक आजार असल्याचं समोर आलं आहे आणि याचा खुलासा दीपिकाच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमधून झाला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दीपिका पदुकोण सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकतीच तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एका आजाराविषयी पोस्ट केली होती. ज्यावर रणवीर सिंहनं सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली होती. ज्यात त्यानं हा आजार त्याला स्वतःला असल्याचं म्हटलं होतं. कोरोना पॉझिटिव्ह बॉलिवूड अभिनेत्रीचा अनुभव, डॉक्टरांबद्दल म्हणाली,'शब्दच नाहीत' दीपिकानं ज्या आजाराविषयी पोस्ट केली होती त्या आजाराचं नाव आहे हायपरसोमनिया. या पोस्टमध्ये दीपिकानं या आजाराची संपूर्ण माहिती सुद्धा दिली होती. याशिवाय या पोस्टमध्ये तिनं स्वतःला आणि पती रणवीर सिंहला टॅग केलं होतं. या पोस्टमध्ये दीपिकानं लिहिलं, हायपरसोमनिया काय आहे. ही एक अशी कंडीशन आहे ज्यात व्यक्ती 12-15 झोपूनही त्याला थकवा जाणवत राहतो. ही पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना दीपिकानं लिहिलं, हा आजार तर ओळखीचा आहे. दीपिकाची ही पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिलं, ‘हा तर मी आहे.’ बऱ्याच काळापूर्वी दीपिकानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की रणवीर 20 तास झोपू शकतो. कोरोना व्हायरसचा आणखी एक बळी, प्रसिद्ध अभिनेत्रीचा उपचारांदरम्यान मृत्यू
  View this post on Instagram

  Dil ka raasta pet se hoke jaata hai 😂❤️ @deepikapadukone

  A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

  दीपिका आणि रणवीरच्या लॉकडाऊन काळाबद्दल बोलायचं तर हे दोघंही सध्या घरी असून एकमेकांसोबत खूप एंजॉय करत आहेत. दीपिका वेगवेगळे पदार्थ करुन रणवीरला खाऊ घालत आहे. तसेच वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ दोघंही शेअर करत आहेत. लग्नाच्या 11 वर्षांनंतर घटस्फोट, दिया मिर्झानं सांगितली नातं तुटण्यामागची कहाणी
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Deepika padukone, Ranvir singh

  पुढील बातम्या