प्रेक्षक पोट धरून हसत होते, परफॉर्मन्सदरम्यानच भारतीय कॉमेडियनचा झाला मृत्यू

प्रेक्षक पोट धरून हसत होते, परफॉर्मन्सदरम्यानच भारतीय कॉमेडियनचा झाला मृत्यू

भारतीय वंशाचा कॉमेडियन मंजूनाथ नायडू याचा दुबईतील एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर दुर्दैवी मृत्यू झाला.

  • Share this:

मुंबई, 21 जुलै : आजकाल कोणाचा कधी मृत्यू होईल हे सांगता येत नाही. अनेक कलाकारांचा कार्यक्रमांच्या सादरीकरणा दरम्यान मृत्यू झाल्याच्या घटना ऐकीवात आहे. नुकतंच भारतीय वंशाच्या एका कॉमेडियनच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. भारतीय वंशाचा कॉमेडियन मंजूनाथ नायडू याचा दुबईतील एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर दुर्दैवी मृत्यू झाला आणि विशेष म्हणजे आजूबाजूला एवढे लोक असतानाही कोणाच्याही ही गोष्ट लक्षात आली नाही. परफॉर्मन्स दरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं मजूनाथचा मृत्यू झाला.

वेब सीरिजमधील बोल्ड सीननंतर प्रिया बापटनं केलं हटके फोटोशूट

‘खलीज टाइम्स’नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 36 वर्षीय मंजूनाथ त्याच्या शुक्रवारच्या शेड्यूलनुसार दुबईमधील हॉटेल ‘अल बरशा’ येथे स्टेज परफॉर्मन्स करत होता. हा कार्यक्रम जवळापास 2 तासांचा होता. कार्यक्रमाचा शेवटचा काही भाग बाकी असताना मंजूनाथला हृदय विकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. परफॉर्म करत असताना अगोदर तो खुर्चीवर बसला आणि नंतर खाली पडला.

OMG! पैशांसाठी बहिणीचे फोटो विकायचा सनी लिओनीचा भाऊ

मंजूनाथ खुर्चीवरून खाली पडल्यावर प्रेक्षक हसू लागले. हा त्याच्या परफॉर्मन्सचाच एक भाग असल्याचा प्रेक्षकांचा समज झाला. पण काही वेळानंतर मंजूनाथ अजिबात हालचाल करत नसल्याचं सर्वांच्या लक्षात आलं. त्यावेळी त्याच्या जवळ गेल्यावर त्याचा मृत्यू झाल्याचं लक्षात आलं. मंजूनाथच्या जाण्यानं त्याचे कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार या सर्वांनाच दुःखद धक्का बसला आहे.

हॉटनेसच्या बाबतीत बॉलिवूड हिरोईन्सनाही मागे टाकते ही टीव्ही अभिनेत्री, पाहा फोटो

मंजूनाथचा जवळचा मित्र मिरादादनं ‘खलीज टाइम्स’शी बोलताना सांगितलं, शोच्या शेवटच्या काही भाग बाकी होता आणि सर्वजण खूश होते. हसत होते. त्यावेळी मंजूनाथ त्याच्या आयुष्यातील त्याच्या वडीलांसोबतचे काही किस्से सांगत होता. याच वेळी त्यानं त्याच्या एंजाइटी समस्येबाबतही सांगितलं होतं. त्यानंतर काही वेळातच तो स्टेजवर कोसळला. पण सर्वांनी तो शोचा एक भाग असल्याचं समजल्यानं मंजूनाथला वेळेत मदत मिळू शकली नाही आणि त्यानं जागीच प्राण सोडला. तो स्टेजवर कोसळल्यानंतर 20 मिनिटांनंतर त्याला मदत मिळाली. पण त्याला वाचवणं शक्य झालं नाही.

==================================================================

SPECIAL REPORT: विहीर नाही तर पाणी चोरीला गेलं; ग्रामस्थांवर राखण करण्याची वेळ

First published: July 21, 2019, 2:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading