नवी दिल्ली, 6 मार्च: छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत अभिनेत्री मंदिरा बेदीने (Mandira Bedi) अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. मंदिरा बेदी एक चांगली अभिनेत्री तसेच, एक प्रसिद्ध टीव्ही अँकर आहे. जेव्हा तिने क्रिकेट टूर्नामेंटचे अँकरिंग सुरू केले तेव्हा क्रिकेटर्स तिच्याशी कसे वागायचे. याचा गंभीर खुलासा तिने एका मुलाखतीदरम्यान केला आहे. मंदिरा बेदीने 2003 आणि 2007 मध्ये मंदिराने ICC क्रिकेट विश्वचषक, 2004 आणि 2006 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंडियन प्रीमियर लीग सीझन 2 साठी अँकरिंग केले आहे. मंदिरा ही त्या काही महिलांपैकी एक होती ज्यांनी टीव्हीवर क्रिकेट स्पर्धांमध्ये अँकरिंग केली होती. एका मुलाखती दरम्यान, तिने आपल्या या प्रवासावर भाष्य करत मोठा खुलासा केला आहे. ‘सुरुवातीला मला कुणीच स्वीकारलं नाही. माझ्या पॅनेलवर लोक चर्चेसाठी आले नाहीत. आज अनेक माजी क्रिकेटपटू माझे मित्र आहेत पण साडी नेसलेली मुलगी क्रिकेटबद्दल बोलते हेही त्यांना आवडले नाही. मला कोणीही मार्गदर्शन केले नाही, कोणी प्रश्न विचारला नाही. तसेच ती पुढे म्हणाली, ‘मला सांगण्यात आले होते की, त्यावेळी तुमच्या मनात जो प्रश्न येतो तो तुम्ही मोकळेपणाने विचारा, मला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. त्यावेळी बरेच क्रिकेटपटू माझ्याकडे ‘ती काय विचारतेय, असं का विचारतेय’ असं टक लावून बघायचे. अखेर त्यांना जे उत्तर द्यायचे होते तेच उत्तर द्यायचे, ज्या उत्तराचा माझ्या प्रश्नाशी काहीही संबंध नव्हता. हे सर्व खूप भीतीदायक वाटेल. क्रिकेटर्सच्या अशा वागण्यामुळे तिला कधीकधी भीती वाटायची. पण त्यावेळी ज्या चॅनेलसाठी ती काम करत होती, त्यांनी अभिनेत्रीला खूप साथ दिली. असल्याचे तिने मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. 150-200 महिलांमधून त्यांनी माझी निवड केली. त्या टीमने मला खूप साथ दिली. आणि आम्ही तुला निवडले आहे, कारण तुझ्यामध्ये ती गोष्ट आहे की तू टिकू शकते, असे ठाम सांगितले त्यामुळे मी कामाचा आनंद घ्यायचा ठरवला. असेही मंदिराने यावेळी सांगितले. मंदिरा बेदी हिने 1994मध्ये दूरदर्शन ‘शांती’ कार्यक्रमातून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. या मालिकेत मंदिरा बेदीच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. आजही चाहते ‘शांती’मुळे मंदिराला ओळखतात. यानंतर मंदिरा बेदी यांनी ‘आहट’, ‘औरत’, ‘घर जमाई’, ‘क्यूं की सास भी कभी बहु थी’ आणि ‘24’ मध्ये काम केले आहे. मंदिरा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि तिची फॅन फॉलोईंगही चांगली आहे. पण, मंदिराच्या बोल्ड आणि हॉट स्टाईलसाठी ओळखली जाणारी मंदिरा बोल्डनेसपेक्षाही एक चांगली अभिनेत्री आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.