मुंबई 29 मार्च: सोफिया हयात (Sofia Hayat) ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. होळीच्या निमित्तानं सध्या तिचे बिकिनीमधील फोटो सर्वत्र चर्चेत आहेत. काही वर्षांपूर्वी तिनं चक्क बिकिनीमध्ये होळी खेळून सर्वांनाच चकित केलं होतं. मात्र त्यानंतर तिनं कधीही सेलिब्रिटींच्या होळी सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला नाही. कारण होळी खेळताना एका व्यक्तीनं तिचा स्कर्टमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला होता. (Sofia Hayat sexual harassment) या लैंगिक गैकवर्तणुकीमुळं सोफियानं सेलिब्रिटी होळी खेळंणं सोडून दिलं.
नेमकं काय घडलं होतं त्यावेळी?
सोफियानं स्पॉटबॉयला दिलेल्या हा धक्कादायक किस्सा सांगितला. ती म्हणाली, “त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक नामांकित सेलिब्रिटी होळी खेळण्यासाठी जमले होते. या पार्टीत अनेक सर्वसामान्य लोकही होते. अनेक जण माझ्यासोबत फोटो काढत होते. अन् मी देखील मोठ्या आनंदानं सर्वांसोबत होळी खेळत होते. त्यावेळी एका व्यक्तीनं फोटो काढण्याच्या निमित्तानं माझ्या स्कर्टमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मी भांगेच्या नशेत होते त्यामुळं मला काही जाणवलं नाही. मी काही प्रतिकार केला नाही हे पाहून त्याची हिंम्मत वाढली अन् त्यानं मला उचलून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या एका पत्रकार मित्रानं मला वाचवलं. भांगेची नशा उतरल्यावर खरा प्रकार माझ्या लक्षात आला. तेव्हापासून मी केवळ माझे मित्र-मैत्रीणी आणि कुटुंबीयांसोबत होळीचा आनंद घेते. सेलिब्रिटींच्या होळीमध्ये जाणं शक्यतो टाळते.”
अवश्य पाहा - मुलांनी निकवर मारले रंगांचे फुगे; पाहा अंबानींच्या होळीत प्रियांकाची धम्माल
होळी, धूलिवंदनावर करोनाचं सावट
यंदा होळी धूलिवंदनावर करोनाचे सावट आहे. करोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पाश्र्वाभूमीवर पालिके ने होळी आणि धूलिवंदन हा सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई केली आहे. तसेच आखून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी पालिके च्या प्रत्येक विभाग कार्यालयांतर्गत पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रसंगी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.