मुंबई 29 मार्च: मनोरंजनसृष्टीत सध्या विविध पुरस्कारांचे वारे वाहात आहे. अलिकडेच राष्ट्रीय पुरस्कार आणि आयफा पुरस्कांची जादू पाहायला मिळाली. त्यानंतर आता गेले कित्येक दिवस चर्चेत असलेला झी मराठी पुरस्कार सोहळा देखील पार पडला. (Zee Marathi Awards 2020-21) दरवर्षी प्रमाणे यंदाही झी वाहिनीवरील मालिकांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना या पुरस्कारानं सन्मानित केलं गेल. या सोहळ्यात ‘देवमाणूस’ मालिकेत डॉ. अजित कुमार देव (Devmanus dr ajit kumar dev) ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता किरण गायकवाड याला सर्वोत्कृष्ट खलनायक या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. शिवाय या पुरस्कारांवर ‘माझा होशील ना’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘देवमाणूस’ या मालिकांचं वर्चस्व पाहायला मिळालं. तर मग पाहूया झी मराठी पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी....
झी मराठी अवॉर्ड्स 2020-21 – पुरस्कारांची संपूर्ण यादी
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत – अशोक पत्की (माझा होशील ना)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (स्त्री) – सुमन काकी (येऊ कशी तशी मी नांदायला)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष) – शशिकांत बिराजदार (माझा होशील ना)
सर्वोत्कृष्ट भावंडं – ब्रह्मे मामा (माझा होशील ना)
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (स्त्री) – सरु आजी (देवमाणूस)
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (पुरुष) – टोण्या (देवमाणूस)
सर्वोत्कृष्ट आई – शकू (येऊ कशी तशी मी नांदायला)
सर्वोत्कृष्ट बाबा – दादा साळवी (येऊ कशी तशी मी नांदायला)
सर्वोत्कृष्ट सासू – आसावरी (अग्गंबाई सासूबाई)
सर्वोत्कृष्ट सासरे – ब्रह्मे मामा (माझा होशील ना)
सर्वोत्कृष्ट खलनायिका – मालवीका (येऊ कशी तशी मी नांदायला)
सर्वोत्कृष्ट खलनायक – डॉ. अजितकुमार देव (देवमाणूस)
सर्वोत्कृष्ट सून – शुभ्रा (अग्गंबाई सासूबाई)
View this post on Instagram
एकूण पुरस्कार – 13
माझा होशील ना – 04
येऊ कशी तशी मी नांदायला – 04
देवमाणूस – 03
अग्गंबाई सासूबाई – 02
विशेष पुरस्कार
सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स : रेवती बोरकर (काय घडलं त्या रात्री)
प्रभावशाली व्यक्तिरेखा : समरप्रताप जहागीरदार (पाहिले ना मी तुला)
गोल्डन ब्यूटी : स्वीटू (येऊ कशी तशी मी नांदायला)
अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेता किरण गायकवाड यांनी या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. पुढच्या रविवारी ‘झी मराठी अवॉर्ड्स 2020-21’चा उत्तरार्ध रंगणार आहे. यावेळी सर्वोत्कृष्ट स्त्री आणि पुरुष व्यक्तिरेखा, कथाबाह्य कार्यक्रम, सूत्रसंचालक, नायक, नायिका, जोडी, कुटुंब, मालिका यासारखे पुरस्कार प्रदान केले जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.