मुंबई, 22 नोव्हेंबर : रिक्षावाला फेम अभिनेत्री मानसी नाईक मागच्या काही काळापासून चांगलीच चर्चेत आली आहे. मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्यात काही आलेबेल नसून दोघे घटस्फोट घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावर मानसीनं काही स्पष्टपणे सांगितलं नव्हतं. पण अखेर चर्चांना पूर्णविराम देत मानसी नाईकनं घटस्फोटांच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. हो मी घटस्फोट घेतेय. त्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे असं मानसी नाईकनं स्पष्ट सांगितलं आहे. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना तिनं ही माहिती दिली आहे. मानसी नाईकच्या या खुलास्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मानसी आणि प्रदीप यांनी मागच्या वर्षी लग्न केलं. मात्र अवघ्या दीड वर्षात दोघांमधील नात्याला पूर्ण विराम देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. दोघांना सोशल मीडियावर पसंती मिळाली होती. दोघांचे रिल्स व्हिडीओ सातत्यानं व्हायरल होत होते. घटस्फोटांच्या चर्चांवर मानसी नाईकनं म्हटलंय, हो घटस्फोटांच्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोट बोलणार नाही. मी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दिला आहे. या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दु:खी आहे. यासगळ्यात नेमकं काय चुकलंय हे सांगणं आता माझ्यासाठी खूप कठीण आहे. आमच्यात काही गोष्टी ठिक होऊ शकल्या नाहीत. हे सगळं खूप वेगात घडलंय. पण मला माझ्या प्रेमावर आजही विश्वास आहे. हेही वाचा - Manasi Naik : ‘माझे संगोपन अशा कुटुंबात झाले जिथे…’; मानसीच्या पोस्टमुळे घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण मानसी पुढे म्हणाली, मला पुन्हा प्रेम करायचं आहे. एक वेळ अशी होती जेव्हा मला माझं कुटुंब हवं होत आणि मी तेव्हा लग्न केलं. ते ही फार घाईघाईत झालं. मला वाटतं तिथेच काहीतर चुकलं. पण आता या लग्नाच्या नात्यातून वेगळं होण्याची वेळ आली आहे. पण त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मला कायम आदर आहे. पण एक स्त्री म्हणून मला माझा स्वाभिमान आहे. स्वत:ची काही मतं आहेत आणि ती महत्त्वाची आहेत. एखाद्या व्यक्तीला आपण सोडून देऊया इतक्या खालच्या थराला ती व्यक्ती जाऊ शकते हे कळणं माझ्यासाठी गरजेचं होतं.
अशा नात्यातून बाहेर पडा मानसी नाईक म्हणाली, आजकाल लोक मानसिक आरोग्यबाबत बोलत असतात. आपल्या पार्टनरनं एकमेकांना कसं समजून घ्यावं, एकमेकांशी कसं बोलावं हे सांगताना दिसतात पण नात्यात समजूतदारपणा नसेल तर ती तुमच्यासाठी धोक्याची सूचना आणि अशा नात्यातून लगेच बाहेर पडा आणि पुढे जा, असा सल्ला तिनं दिला.
तसंच ती म्हणाली, मी पुण्यात लहानाची मोठी झाली. ज्या माणसावर तुम्ही प्रेम करता त्याला नेहमीच पाठिंबा देता यावर माझा विश्वास आहे. मी माझं काम केलं पण एकाच व्यक्तीला समर्थन मिळतय आणि एकाला नाही मग अशा नात्यातून बाहेर पडणं कधीही चांगलंच.
करिअरवर फोकस करायचं आहे मला या सगळ्यातून बाहेर येऊन माझ्या करिअरवर फोकस करायचं आहे. ही वेळ माझ्या करिअरवर लक्ष देण्याची आहे. माझं कुटुंब, माझे मित्र मैत्रीणी, मी आणि माझे प्रेक्षक माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. कधी कधी आपला आपल्या माणसावरून विश्वास उडतो. माझ्याबाबतीतही हेच झालं. मला भावनिकदृष्ट्या आधाराची गरज होती पण मला माझ्याबरोबर या नात्यात असं काहीच घडलं नाही, असं मानसी म्हणाली.

)







