आज 7 ऑक्टोबर 20201 पासून नवरात्री उत्सवाला प्रारंभ होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्रींमध्ये नवरात्रौत्सवानिमित्ताने विविध फोटोशूट्स करण्याचा मोठा ट्रेंड पाहण्यास मिळतो. आज देखील मराठी अभिनेत्रींनी आज पहिल्या दिवशी पिवळा रंग असल्याने त्या रंगात खास फोटोशूट केलं आहे.
मराठमोळी अभिनेत्री रश्मी अनपट हिने देखील पिवळ्या रंगाच्या साडीत काही फोटो शेअर करत सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. डॉन फेम अभिनेत्री श्वेता शिंदेने देखील पिवळ्या रंगाचे फुलाचे दागिने घालून हटके फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने देखील पिवळ्या रंगच्या साडीत काही फोटो शेअर करत नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सर्वांची लाडकी डिंपल म्हणजे अभिनेत्री अस्मिता देशमुख हिने देखील पिवळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने देखील तुळजाभवानी देवीचे दर्शन घेताना फोटो शेअर करत नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतील अभिनेत्री नंदिता पाटकर हिने देखील पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे.