झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' ही मालिका अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली होती. मालिकेतील इंद्रा आणि दीपूची हटके केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. ही मालिका खासकरुन तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय झालेली पाहायला मिळालं होतं. मात्र आता ही मालिका बंद होण्याच्या मार्गावर आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंगदेखील पूर्ण झालं आहे. कलाकारांनी शूटिंग पूर्ण होताच एकत्र येत सुंदर असे फोटोसुद्धा क्लिक केले आहेत. या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर केले आहे. या फोटोंना प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. शिवाय मालिका बंद न करण्याचीही मागणी होत आहे. या मालिकेची जागा आता 'तू चाल पुढं' ही नवी मालिका घेणार आहे.