मुंबई, 15 जुलै: प्रेक्षाकांची लाडकी मालिका अर्थात ‘मन उडू उडू झालं’ आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. अनेक संकटांवर मात करुन इंद्रा आणि दीपूच्या प्रेमाचा विजय झाला आहे. इंद्राला दिलेलं चॅलेंज त्यानं पूर्ण करत पुन्हा एकदा देशपांडे सर आणि संपूर्ण घरातील मंडळींच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. देशपांडे सरांनी इंद्रा दीपूचं नातं स्वीकारल्यानं आता दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी दोन्ही घरांमध्ये सुरू झाली आहे. इंद्रा दीपूच्या लग्न म्हणजे पद्धतशीर सोहळा हा आलाच. इंद्रा दीपूच लग्नाआधीचा कांदा पोह्यांचा कार्यक्रम देशपांडेच्या घरी रंगणार आहे. कांदा पोह्यांच्या कार्यक्रम खास असणार आहे कारण दीपू तिच्या लाडक्या इंद्राजींसाठी खास उखाणा घेणार आहे. मन उडू उडू झालं मालिकेच शुटींग पूर्ण झालं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच मालिकेच्या येणाऱ्या भागातील एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यात दीपू इंद्रासाठी सुरेख उखाणा घेताना दिसत आहे. मालिकेच्या येत्या भागात आपण पाहणार आहोत की, इंद्रा दीपूच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी देशपांडेंच्या घरात कांदे पोह्यांच्या कार्यक्रम रंगणार आहे. तेव्हा दीपू आणि आईचा एक भावूक क्षण पाहायला मिळणार आहे. हेही वाचा - Man Udu Udu Zala: ‘मन रडू रडू झालं’; मालिका संपताना कलाकारांचा वन लास्ट डान्स झाला VIRAL येत्या भागात आपण पाहणार आहोत की, मालती दीपूला तिच्या हाताने तयार करते. तेव्हा मी इंद्रा जींसाठी खास उखाणा तयार केल्याचं दीपू सांगते. फार समाधानानं आणि आनंदी मनानं दीपू इंद्रासाठी तयार केलेला उखाणा आईला घेऊन दाखवते.
दीपू म्हणते, ‘आभाळा एवढं प्रेम माझ्या नशीबात आलं, त्यांच्यबरोबर असणंच माझं जग झालं. इंद्राजींचं नाव घेते आता मन उडू उडू झालं’. इतके दिवस प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते अखेर मालिकेचं कलाकारांच्या तोंडून ऐकायला मिळालं. इंद्रा दीपूची लव्ह स्टोरी अखेर सक्सेस झाली. सोशल मीडियावर मालिकेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. नुकतंच कलाकारांनी मालिकेचा शेवटचा सीन शुट करुन एक सक्सेस पार्टी केली. त्याचे फोटोही कलाकारांनी शेअर केले आहेत. मालिका संपणार असल्यानं प्रेक्षकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. मालिका बंद करु नका अशी मागणी करण्यात आली होती मात्र अखेर मालिका प्रेक्षकांची निरोप घेत असल्याचं शिक्का मोर्तब झालं आहे.