मुंबई 14 ऑगस्ट: झी मराठीवरील मन उडू उडू झालं मालिकेने एक वेगळीच लोकप्रियता मिळवली. इंद्रा दिपूची ही जोडी प्रेक्षकांना एवढी आवडली की मालिका संपूनही त्यांची आठवण सतत निघताना दिसते. सध्या इंद्राची भूमिका साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊत एका हटके भूमिकेत पुन्हा एकदा समोर येणार आहे. अजिंक्य टकाटक 2 या अडल्ट कॉमेडी सिनेमात दिसणार आहे. एवढंच नाही तर या सिनेमात अजिंक्य एक सणसणीत बोल्ड सीन देताना दिसणार आहे. या सीनसाठी त्याने स्वतःला तयार कसं केलं याबद्दल त्याने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं आहे. इंद्राच्या भूमिकेने अजिंक्यची (ajinkya raut bold scene in takatak 2) एक वेगळी इमेज तयार झाली. दिपूची काळजी घेणारा, प्रेमात वेडा पण तितकाच शहाणा आणि सच्च्या मनाचा इंद्रा साकारताना अजिंक्यला मजा आली असं तो सांगतो. पण मालिकेनंतर त्याला अशा अवतारात बघून प्रेक्षकांची संमिश्र प्रतिक्रिया समोर येतेय असं त्याने स्वतः सांगितलं आहे. “सिनेमात माझं पात्र शऱ्या असं आहे. याआधी मी कधीच असं बोल्ड पात्र साकारलं नाहीये. मला शिव्या द्यायची सवय नाहीये त्यामुळे हे पात्र साकारताना मी शक्य तितका निरागस भाव ठेवायचा प्रयत्न केला आहे. माझ्या पात्राचं शूट सुरु झाल्यावर अगदी सुरुवातीच्या काळातला सीन हा किसिंगचा होता. एका मोकळ्या मैदानावर सीन शूट होणार होता. पण मी ठरवलं होतं की आता यामध्ये उडी घेतलीये तर काम चोख करायचं आणि आपल्या स्वभावापेक्षा वेगळं काहीतरी करावं लागलं तरी करायचं. त्यामुळे मी माझं शंभर टक्के देऊन हे धाडस करायचा प्रयत्न केला आहे. तो सीन झाल्यावर अक्षरशः एखादा टप्पा पार केल्यासारखं वाटत होतं.”
सध्या अजिंक्यची या सिनेमातील अंदाजामुळे वेगळी प्रतिमा तयार होत आहे. यावर तो सांगतो, “मी हा सिनेमा लॉकडाउनच्या काळात केला जेव्हा मी परभणीहून मुंबईला एका प्रोजेक्टसाठी आलेलो आणि तो प्रोजेक्ट मी करत नाहीये असं मला समजलं. मन उडू उडू झालं ही माझ्या आयुष्यात नंतर आलेली मालिका आहे. हा सिनेमा मी एक वेगळा प्रयोग म्हणून केला. स्वतःच्या कम्फर्ट झोन पलीकडे जाऊन काहीतरी करावं म्हणून हा सिनेमा केला. हे ही वाचा- Aavishkar Darwhekar: स्नेहा वाघच्या एक्स-हसबंडने पुन्हा केलं लग्न; फोटो शेअर करत म्हणाला… यातून मला बरीच शिकवण मिळाली. एकीकडे मला रोमँटिक प्रोजेक्ट कारायचे आहेतच पण असं काम सुद्धा मी करू शकतो हे मला समजलं. अनेकांना हा सिनेमा येतोय कळल्यावर त्यांची खूप संमिश्र प्रतिक्रिया होती. काहींनी माझ्या या प्रयत्नाला सपोर्ट केला काहींना मी मालिकेत साकारलं तसा हिरो साकारावा असं वाटत आहे.”