मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Pushpa ने थलायवाला टाकलं मागे! Allu Arjun चे सुपरस्टार रजनीकांत यांच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स

Pushpa ने थलायवाला टाकलं मागे! Allu Arjun चे सुपरस्टार रजनीकांत यांच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun Pushpa) तर सगळ्या देशाचा लाडका हिरो झाला आहे. त्याच्या चाहत्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून त्याने चक्क 'वन अँड ओन्ली' थलायवा रजनीकांत यांना मागे टाकलं आहे

मुंबई, 03 फेब्रुवारी: देशभरात सगळीकडे सध्या एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे तो चित्रपट म्हणजे 'पुष्पा: द राईज '(Pushpa: The Rise). तमिळ, हिंदी आणि इतर काही भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कमाईचे सगळे विक्रम मोडीत काढले असून, या चित्रपटाचा हिरो दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun Pushpa) तर सगळ्या देशाचा लाडका हिरो झाला आहे. त्याच्या चाहत्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून, ट्विटरवर (Allu Arjun Twitter Followers) त्याच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल 60 लाख 50 हजारांहून अधिक झाली आहे. याबाबतीत त्यानं दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत (Superstar Rajinikanth) आणि चिरंजीवी (Chiranjeevee) यांनादेखील मागं टाकलं आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची संख्या ट्विटरवरच वाढलेली नाही तर इन्स्टाग्रामवरदेखील (Allu Arjun Instagram) त्याच्या चाहत्यांच्या संख्येनं तब्बल दीड कोटीचा टप्पा पार केला आहे. त्याचे इन्स्टावर 1 कोटी 62 लाख चाहते आहेत. आपल्या आवडत्या हिरोचे लोकप्रियतेतील हे उच्चांक पाहून त्याच्या चाहत्यांचा आनंदही ओसंडून वाहत आहे. हे वाचा-MS Dhoni ची नवी इनिंग, अथर्व: द ओरिजिन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! अल्लू अर्जुनचे ट्विटरवर 60 लाख 50 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर थलैवा रजनीकांतचे 60 लाख 10 हजार फॉलोअर्स आहेत. तर चिरंजीवीचे 10 लाख 20 हजार ट्विटर फॉलोअर्स आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अल्लू अर्जुन ट्विटरवर फारसा सक्रीय नाही आणि तो ट्विटरवर कोणालाही फॉलो करत नाही. तो क्वचितच ट्विटरवर पोस्ट करतो. चित्रपटाचे प्रमोशन असो किंवा कुणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील अशा वेळीच अल्लू अर्जुन ट्विटरवर एखादी पोस्ट करतो. अल्लू अर्जुन ट्विटरवर कोणत्याही सेलिब्रिटीला किंवा कुटुंबातील सदस्यालादेखील फॉलो करत नाही. उलट त्यालाच अनेक बडे स्टार्स फॉलो करतात. अल्लू अर्जुन आपल्या अभिनयानं गेली अनेक वर्षं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवत आहेच, त्याच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे, पण सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात प्रदर्शित झालेल्या त्याच्या पुष्पा या चित्रपटानं त्याच्या करिअरला वेगळीच उंची गाठून दिली आहे. कोरोनाच्या काळात अनेक बिग बजेट चित्रपटांना मर्यादित यश मिळालेलं असताना पुष्पा चित्रपटाने केलेली ही कामगिरी थक्क करणारी आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि गाणीही प्रचंड गाजली आहेत. दक्षिण भारतात कलाकारांना देव मानण्याची प्रथा आहे. त्यांचे मोठ-मोठे कटआउट जागोजागी उभारले जातात. रजनीकांत तर या फिल्मी देवांचा देव आहे असं तिथली जनता मानते. त्यामुळे अल्लूने त्यापेक्षा प्रसिद्धी मिळवणं हे खरोखरंच कौतुकास्पद आहे.
First published:

Tags: Allu arjun, Rajnikant, Superstar rajnikant

पुढील बातम्या