जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कोण आहे Vijay Babu? बलात्काराच्या गंभीर आरोपामुळे दाक्षिणात्य अभिनेता अडचणीत

कोण आहे Vijay Babu? बलात्काराच्या गंभीर आरोपामुळे दाक्षिणात्य अभिनेता अडचणीत

कोण आहे Vijay Babu? बलात्काराच्या गंभीर आरोपामुळे दाक्षिणात्य अभिनेता अडचणीत

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून आलेल्या एका बातमीने मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे. मल्याळम अभिनेता विजय बाबू याच्यावर बलात्काराचा (Rape Case) आरोप करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 एप्रिल: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून आलेल्या एका बातमीने मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे. मल्याळम अभिनेता विजय बाबू याच्यावर बलात्काराचा (Rape Case) आरोप करण्यात आला आहे. चित्रपटांमध्ये काम देण्याच्या आमिषाने महिलेसोबत शारीरिक संबंध बनवल्याचा आरोप या अभिनेत्यावर लावण्यात आला आहे. विजय बाबू मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय चेहरा आहे. अभिनेत्यासोबतच तो एक निर्माता आणि उद्योजकसुद्धा आहे. परंतु या अभिनेत्याबद्दल अशी माहिती समोर येताच मनोरंजनसृष्टी हादरुन गेली आहे. कोण आहे विजय बाबू? विजय बाबू (Who is Vijay Babu?) हा मल्याळम सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता असून, समाजातील ज्या विषयांवर भाष्य करण्यात आलेले नाही तशा सिनेमांना पाठिंबा देण्यासाठी तसेच नवीन प्रतीभांना प्रोत्साहन देण्यासाठी हा अभिनेता ओळखला जातो. मात्र आता या आरोपांनंतर मल्याळम मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. त्याने फ्रायडे फिल्म हाऊसची स्थापना केली आहे. मुळचा कोल्लममधील असलेल्या विजयने मदुराईमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. NDTV ने याविषयी वृत्त दिले आहे. हे वाचा- धक्कादायक! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप, सिनेसृष्टीत एकच खळबळ त्याने मुंबईत स्टार इंडियासह काम केले आहे. शिवाय दुबईमध्ये उद्योजक बनण्याचाही त्याने प्रयत्न केला. यानंतर एशियानेट आणि सितारा टीव्हीमध्ये वरिष्ठ पदावर रूजू होण्यासाठी तो हैदराबादमध्ये पोहोचला. 2009 मध्ये ते सूर्या टीव्हीचा उपाध्यक्ष होण्यासाठी तो केरळला परतला होता. चार वर्षांनंतर त्याने टीव्ही इंडस्ट्रीला राम राम केला. मल्याळम सिनेसृष्टीत नशिब आजमावण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला होता. पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे विजय बाबू 2014 मध्ये ‘फिलिप्स आणि द मंकी पेन’साठी विजय बाबूने निर्माता म्हणून केरळ राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट पुरस्कार जिंकला. अभिनेता आणि निर्माता म्हणून त्याच्या प्रमुख चित्रपटांमध्ये पेरुचाझी, आडू, मुधुगव, आडू 2 आणि होम यांचा समावेश आहे. यापैकी बऱ्याच सिनेमांमध्ये आधी कधी न भाष्य करण्यात आलेल्या समाजातील विविध विषयांवर भाष्य करण्यात आले आहे. त्याने तरुण टॅलेंटलाही संधी दिली होती. हे वाचा- Ameesha Patel विरोधात तक्रार दाखल, अभिनेत्रीवर फसवणूक केल्याचा आरोप रिपोर्ट्सनुसार, कोडीझोड भागात राहणाऱ्या पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार विजय बाबूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने तक्रार करत म्हटलं आहे, ‘चित्रपटांमध्ये काम देण्याच्या आमिषाने आपलं शारीरिक शोषण करण्यात आलं आहे’. ही माहिती समोर येताच एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार 22 एप्रिल रोजी प्राप्त झाली होती. फिर्यादीच्या आरोपानुसार बाबूने कोची येथील फ्लॅटमध्ये एकापेक्षा जास्त वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात