जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ameesha Patel विरोधात तक्रार दाखल, अभिनेत्रीवर फसवणूक केल्याचा आरोप

Ameesha Patel विरोधात तक्रार दाखल, अभिनेत्रीवर फसवणूक केल्याचा आरोप

Ameesha Patel विरोधात तक्रार दाखल, अभिनेत्रीवर फसवणूक केल्याचा आरोप

‘गदर’ फेम अभिनेत्री अमिषा पटेल हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्री विरोधात तक्रार दाखल (Case File Against Actress Ameesha patel) करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 एप्रिल: ‘गदर’ फेम अभिनेत्री अमिषा पटेल हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्री विरोधात तक्रार दाखल (Case File Against Actress Ameesha patel) करण्यात आली आहे. या अभिनेत्रीवर असा आरोप करण्यात आला आहे की, एका कार्यक्रमासाठी तिने पूर्ण पैसे घेतले होते, पण ती अर्धवट परफॉरमन्स करुन तिथून निघून गेली. सामाजिक कार्यकर्ते सुनिल जैन यांनी अभिनेत्रीच्या विरोधात तक्रार केली आहे. मात्र अभिनेत्रीने या कार्यक्रमाच्या आयोजकांवरच आरोप केला आहे. अभिनेत्रीत्या मते, या कार्यक्रमाचे व्यवस्थापन ठीक नव्हते. तिला या कार्यक्रमात ‘जीवाला धोका’ असल्याचे जाणवल्याचा आरोप अभिनेत्री अमिषा पटेल हिने केला आहे. अभिनेत्री याबाबत ट्वीट (Ameesha Patel Tweet) देखील केले होते. अभिनेत्रीने काय केले आहे ट्वीट? अभिनेत्रीने असं ट्वीट केलं आहे की, मध्य प्रदेशमध्ये खंडवा याठिकाणी 23 एप्रिल 2022 रोजी नवचंडी महोत्सवामध्ये उपस्थित होते. स्टार फ्लॅश एंटरटेनमेट आणि अरविंद पांडे यांच्याकडून खूप खूप खूप खूप वाईट आयोजन करण्यात आलं होते. मला माझ्या जीवाला धोका वाटला होता पण स्थानिक पोलिसांचे आभार ज्यांनी माझी काळजी घेतली.

जाहिरात

मंगळवारी, कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक सुनील जैन नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याने अमिषाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी अशी तक्रार केली आहे की तिने कार्यक्रमासाठी खूप मोठी रक्कम घेतली होती परंतु ठरवलेल्या कालावधीत सादरीकरण केले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार ती केवळ 5 मिनिट्स डान्स करून निघून गेली. **हे वाचा-** ‘Munawar Faruqui पासून दूर राहा’, अंजली अरोराच्या आईचा लेकीला सल्ला वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती ‘गदर 2’ मध्ये दिसणार आहे. यामध्ये ती पुन्हा एकदा सनी देओलसह स्क्रीन शेअर करते आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अनिल शर्मा करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात