मुंबई, 26 जून : अभिनेता अर्जुन कपूर आज त्याचा 36वा वाढदिवस साजरा करतोय. रात्री बारा वाजताच अर्जुनने त्याच्या घरी बर्थ डे पार्टी केली. फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर अर्जुन दिसला. दरम्यान अर्जुन आणि मलायका हे बॉलिवूड कपल या पार्टीत एन्जॉय करताना दिसलं. दोघांचं एकमेकांवरील प्रेम आजवर लपून राहिलेलं नाही. बॉयफ्रेंडचा बर्थ डे आहे म्हटल्यावर मलायकाना देखील अर्जुनसाठी खास रोमॅण्टिक अशी पोस्ट शेअर केली आहे, सोबत अर्जुनचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. आज अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने खास पोस्ट शेअर केली आहे. मलायकाने इन्स्टाग्रामवर अर्जुनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये मलायका लिहिते की, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय सनशाईन, थिंकर, गूफी, शॉपोहोलिक, माय हँडसम…. अर्जुन कपूर. वाचा- नेहमी पुढे..पुढे बोलणाऱ्या कपिल शर्माची मौसमी चॅटर्जी यांनी कोली बोलती बंद बॉलीवूडच्या कित्येक सेलिब्रेटींनी देखील अर्जूनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांनी अर्जूनविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. मलायकानं अर्जूनच्या प्रेमाचे वर्णन करताना तो माझा खूप लाडका आहे असे म्हणत मी जसे सांगते तसा तो ऐकतो आणि वागतो. या शब्दांत त्याचे वर्णन केले आहे. मला शॉपिंगचे प्रचंड वेड आहे. यात अर्जून न थकता माझ्यासोबत असतो. त्यासाठी त्याचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे. असेही मलायकानं म्हटले आहे. आता मलायकानं अर्जूनवर शुभेच्छा त्याच्याविषयी दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
मलायका आणि अर्जुन कपूर मागील 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करू लागले. डेटिंगच्या काही वर्षातच त्यांनी त्यांच्या नात्याची कबूली दिली. दोघांच्या नात्यात 13 वर्षांचं अंतर असून अनेकदा यावरून दोघे ट्रोल देखील होत असतात.
अर्जुन कपूरच्या वर्क फ्रंट विषयी सांगायचं झालं तर ‘कुत्ते’ हा त्याचा शेवटचा प्रदर्शित झालेला सिनेमा आहे. अभिनेत्री तब्बू आणि राधिका मदनबरोबर त्याने स्क्रिन शेअर केली होती. त्याआधी अर्जुन कपूर ‘एक विलन रिटर्न्स’ सिनेमात तो दिसला होता. येणाऱ्या काळात अर्जुन कपूर ‘मेरी पत्नी का रिमेक’ सिनेमा दिसणार आहे.