मुंबई, 07 मार्च : अभिनेत्री मलायका अरोरा अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर काही ना काही कारणानं नेहमीच चर्चेचा विषय ठरते. कधी ड्रेसिंग स्टाइल तर कधी अर्जुन कपूरसोबतचं अफेअर. पण यासोबतच तिच्या फिटनेसची सुद्धा सोशल मीडियावर खूप चर्चा होते. वयाच्या 46 व्या वर्षीही मलायकाचा फिटनेस कोणलाही लाजवेल असाच आहे. त्यामुळे सोशल मीडियावर शेअर केलेला तिचा कोणताही फोटो चर्चेचा विषय ठरतो. आताही तिचा असाच एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे आणि एका डिझायनरनं केलेल्या कमेंटची चर्चा सगळीकडे होत आहे.
मलायकानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक बॅक साइड बिकिनी फोटो शेअर केला आहे. ज्यात ती स्विमिंग पूलच्या साइडला बसलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करताना मलायकानं लिहिलं, ‘मागे आणि पुढे बघा’ मलायकाच्या फोटोवर सुप्रसिद्ध डिझायनरनं हटके कमेंट केली आहे ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
विकी-कतरिनानं एकत्र साजरी केली होळी, ईशा अंबानीच्या पार्टीचा इनसाइड Video Viral
डिझायनर विक्रम फर्नांडिसनं मलायकाच्या या फोटोवर कमेंट केली, ‘जरा पुढे पहा, नाहीतर पाण्यात पडशील.’ तर करिश्मा कपूरनं कमेंटमध्ये आय ब्लिंकचा इमोजी शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी मलायका तिच्या नो मेकअप लुकमुळे चर्चेत आली होती. यावेळी तिच्यासोबत अर्जुन कपूर सुद्धा दिसला होता. हे दोघं डिनर करून निघताना एका हॉटेल बाहेर स्पॉट झाले होते.
‘सूर्यवंशी’च्या टीमसोबत खेळत होती कतरिना, अखेरच्या क्षणी अक्षयनं पलटवली बाजी
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या नात्याची चर्चा बीटाऊनमध्ये जोरदार सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मलायकानं तिच्या ड्रीम वेडिंगच्या आयडिया शेअर केल्यानंतर हे दोघं लवकरच लग्नाच्या बेडीत अडणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अर्जुननं मलायकाशी सध्या लग्न करु इच्छित नसल्याचं स्पष्ट केलं.
हेमा मालिनींनी सांगितली लेकीची अनटोल्ड स्टोरी, सतर्कतेमुळे वाचली इशा देओल