Home /News /entertainment /

25व्या वर्षी लग्न, एका मुलाची आई आणि घटस्फोट.. Arbaaz Khan बरोबरच्या नात्याविषयी Malaika Arora ने पहिल्यांदा सोडलं मौन

25व्या वर्षी लग्न, एका मुलाची आई आणि घटस्फोट.. Arbaaz Khan बरोबरच्या नात्याविषयी Malaika Arora ने पहिल्यांदा सोडलं मौन

लग्नाच्या निर्णयामुळे आपल्या प्रोफेशनल लाइफमध्ये कोणतीही अडचण आली नाही. उलट त्यामुळे आपण इतर महिलांसाठी एक उदाहरण बनल्याचं मत मलायकानं व्यक्त केलं आहे.

मुंबई, 22 जानेवारी: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora Latest News) सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. मलायका अरोराचा ग्लॅमरस लूक असो किंवा तिची स्टाइल, फिटनेस असो किंवा फोटोशूट, या वयातही ती सगळीकडे छाप उमटवते. वयाच्या 48व्या वर्षीही तिनं स्वत:ला कमालीचं फिट ठेवलं आहे. मलायकानं वयाच्या 25व्या वर्षी अरबाज खानशी (Arbaaz Khan) लग्न केलं होतं. दोघांनी 1998 मध्ये लग्न केलं आणि 2017 मध्ये घटस्फोट घेतला. मलायका आणि अरबाजला अरहान नावाचा 19 वर्षांचा एक मुलगादेखील आहे. अभिनेत्री, रिअॅलिटी शो जज आणि डान्सर असलेल्या मलायका अरोराचा वयाच्या 25व्या वर्षी लग्न करण्याचा किंवा वयाच्या 29 व्या वर्षी आई होण्याचा निर्णय चुकीचा होता का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित करण्यात आला आहे. या प्रश्नाला आता स्वत: मलायकानं उत्तर दिलं आहे. लग्नाच्या निर्णयामुळे आपल्या प्रोफेशनल लाइफमध्ये कोणतीही अडचण आली नाही. उलट त्यामुळे आपण इतर महिलांसाठी एक उदाहरण बनल्याचं मत मलायकानं व्यक्त केलं आहे. नम्रता झकारियासोबतच्या एका पॉडकास्ट सेशनमध्ये मलायका अरोरानं आपलं करिअर, लग्न आणि आई होण्याच्या निर्णयाबाबत मोकळेपणानं गप्पा मारल्या. 'लग्न आणि आई होणं या गोष्टी आयुष्यात कधीच अडथळा ठरत नाहीत. याचं मी स्वत: उत्तम उदाहरण आहे. जेव्हा मी लग्न केलं आणि जेव्हा मला मूल (Child) झालं तेव्हा माझ्या प्रोफेशनल लाइफवर (Professional Life) याचा परिणाम होईल, असा विचार मी केला नव्हता. मला याबाबत अनेकांनी आपापली मतं सांगितली; पण माझ्या प्रोफेशनल लाइफवर आई होण्याचा काहीच परिणाम झाला नाही,' असं मलायका म्हणाली. हे वाचा-ज्याद्वारे प्रियांका आई बनली ती सरोगसी म्हणजे काय रे भाऊ? भारतात आहेत हे नियम 'आता प्रेग्नन्सी किंवा आई होणं, ही गोष्ट त्या तुलनेत सोपी झाली आहे. माझ्या वेळी परिस्थिती वेगळी होती. तेव्हा मूल झाल्यानंतर करिअर संपूर्ण जाण्याची भीती असायची; पण मी स्वत:वर विश्वास ठेवला. काहीही झालं तरी सर्व जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीनं पार पाडायच्या, असा निर्धार मी केला होता. याचाच परिणाम म्हणून मी माझ्या प्रेग्‍नन्सीदरम्यान भरपूर काम केलं. मी एमटीव्हीवर शो केले, मी अॅक्टिंग केली आणि प्रवाससुद्धा केला,' असंदेखील मलायकानं सांगितलं. पॉडकास्टमध्ये मलायकानं आपल्या ग्लॅमरस अॅटिड्युडबाबतही भाष्य केलं. 'मला नेहमीच एका खास पद्धतीने ग्लॅमरस दिसायला आवडतं आणि तो अॅटिट्यूड मी कॅरी केला. त्यातून मला पॉझिटिव्हिटी मिळते आणि मी आनंदी आहे,' असं मलायका म्हणाली. मलायकाच्या ग्लॅमरस आणि बोल्ड वर्तणुकीमुळेच अरबाज खान आणि तिचा घटस्फोट (Malaika Arora and Arbaaz Khan Divorce) झाल्याची चर्चा होती; मात्र आपल्याला मलायकाच्या ड्रेसिंग स्टाइलबद्दल काहीही आक्षेप नाही, असं स्वत: अरबाझनंदेखील स्पष्ट केलं होतं. घटस्फोट होण्यापूर्वी अरबाझ आणि मलायका एका चॅट शोमध्ये सहभागी झाले होते. 'मलायका अतिशय फॅशनेबल (Fashionable) आणि तोकडे कपडे (Short Dresses) घालते, हे पाहून पतीला वाईट वाटत नाही का, असा प्रश्न लोकांना पडत असल्याचं शोच्या होस्टनं अरबाझला विचारलं होतं. या प्रश्नाला अरबाझनं समर्पक उत्तर दिलं होतं. 'यात वाईट वाटण्यासारखं काहीही नाही. काय चूक, काय बरोबर आहे, याबाबत निर्णय घेण्यास स्वत: मलायका सक्षम आहे,' असं अरबाझ खान म्हणाला होता. त्या वेळी मलायकासुद्धा आपल्याला आपल्या मर्यादा माहिती असल्याचं म्हटलं होतं. हे वाचा-सलमान खानच्या फार्महाऊसवर कलाकारांचे मृतदेह पुरल्याचा शेजाऱ्याचा धक्कादायक आरोप मलायका आणि अरबाज यांनी लग्नाला 19 वर्षं झाल्यानंतर 2017 मध्ये घटस्फोट घेतला. आता मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) सीरियस रिलेशनशिपमध्ये आहे. अरबाज खान इटालियन मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला (Giorgia Andriani) डेट करत आहे. मलायका अरोरा सध्या आपला मुलगा अरहानसोबत जास्त वेळ घालवत आहे. अरहान परदेशात शिक्षण घेत असून, तो सध्या सुट्ट्यांसाठी घरी आला आहे. 10 डिसेंबर 2021 रोजी अरहान मुंबईला परतला होता. त्याला घेण्यासाठी मलायका आणि अरबाझ दोघेही विमानतळावर गेले होते.
First published:

Tags: Malaika arora

पुढील बातम्या