जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मलायकाला सोडून जातोय मुलगा अरहान; इमोशनल पोस्ट शेअर करत म्हणाली...

मलायकाला सोडून जातोय मुलगा अरहान; इमोशनल पोस्ट शेअर करत म्हणाली...

मलायकाला सोडून जातोय मुलगा अरहान; इमोशनल पोस्ट शेअर करत म्हणाली...

‘पंख पसरवण्याची आता तुझी वेळ आहे….’ मलायकाने मुलाचं कौतकुकही केलं व त्याला मिस देखील करत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 18 ऑगस्ट : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच निरनिराळ्या कारणांसाठी चर्चेत असते. कधी तिच्या प्रोफेशल कामामुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती चर्चेत राहते. तर आता आपल्या मुलाला ती मिस करत आहे. त्यासाठी तिने एक खास पोस्ट देखील लिहीली आहे. मलायका आणि अरबाज (Arbaaz Khan) यांना अरहान (Arhan Khan) हा मुलगा आहे. घटस्फोट झाल्यानंतरही ते दोघेही मुलासाठी नेहमी एकत्र दिसतात. नुकतच संपूर्ण अरोरा कुटुंब आणि अरबाजने एक डिनर प्लॅन केला होता. ज्यात संपूर्ण कुटुंब एकत्र स्पॉट झालं होतं. तर अरबाज आणि मलायकाची आई चांगला बॉन्ड शेअर करताना दिसले. दरम्यान मलायकाचा मुलगा अरहान हा उच्च शिक्षणासाठी आता परदेशात जात आहे. त्यामुळे मलायका आधीच भावुक होताना दिसत आहे. तिने पोस्टमध्ये लिहीलं आहे की, ‘आम्ही दोघेही एका नव्या प्रवसासाठी निघालो आहोत. भीती, उत्सुकता, नवा अनुभव, नर्व्हसनेस यांनी भरलेला प्रवास.. पण मी फक्त इतकच जाणते की, मला माझ्या अरहानचा खूप अभिमान आहे. पंख पसरवण्याची आता तुझी वेळ आहे. भरारी घे आणि तुझी स्वप्न जग. आतापासूनच तुला मिस करत आहे.’ अशी पोस्ट मलायकाने आपल्या मुलासाठी लिहिली आहे.

जाहिरात

लवकरच अरहान परदेशी जाणार आहे. तिने त्याच्यासोबत एक फोटोही शेअर केला आहे. मलायका आणि अरबाज विभक्त झाले असले तरीही त्यांचं आपल्या मुलावर फार प्रेम आहे. अनेकदा ते एकत्र मुलासोबत दिसतात. तसेच अरबाज देखील अरोरा कुटुंबासोबत दिसतो. मलायका घटस्फोटानंतर अभिनेता अर्जुन (Arjun Kapoor) कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांच्या नात्याची नेहमीच चर्चा रंगते. वयाच्या 47 व्या वर्षी स्वतःला तरुणींप्रमाणे फिट ठेवणाऱ्या मलायकाची देखील फारच चर्चा असते. अरबाज देखील एका इटालियन मॉडेल आणि अभिनेत्रीला डेट करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात