जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Malaika-Arjun Engagement: ठरलं! मलायका-अर्जुन लवकरच उरकणार साखरपुडा; याठिकाणी होणार शाही सोहळा

Malaika-Arjun Engagement: ठरलं! मलायका-अर्जुन लवकरच उरकणार साखरपुडा; याठिकाणी होणार शाही सोहळा

मलायका अरोरा

मलायका अरोरा

Malaika arora engagement with Arjun Kapoor know the venue : बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल्सपैकी एक अशी अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या जोडीची ओळख आहे. या जोडीवर नेहमीच सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 फेब्रुवारी- बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल्सपैकी एक अशी अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या जोडीची ओळख आहे. या जोडीवर नेहमीच सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात. मलायका-अर्जुन नेहमीच त्यांच्या नात्याबद्दल चर्चेत असतात. यासोबतच दोघांच्या साखरपुडा आणि लग्नाच्या बातम्या नेहमीच व्हायरल होत असतात. या दोघांना लग्नबंधनात अडकलेलं पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. दरम्यान पुन्हा एकदा या दोघांच्या लग्नाची आणि साखरपुड्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. दोघांच्या साखरपुड्याबाबत एका ट्रेड एक्स्पर्टने सोशल मीडियावर ट्विट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सुरुवातीला मलायका-अर्जुन आपल्या नात्याबद्दल उघडपणे बोलणं टाळायचे. परंतु कालांतराने या दोघांनी बिनधास्तपणे सोशल मीडियावर आपल्या नात्याची कबुली दिली होती. अलीकडे दोघेही सतत सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. तसेच एकमेकांसोबत परदेशात सुट्यांचा आनंद घेतानासुद्धा दिसून येतात. अशातच या दोघांनी आता लग्न करावं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. (हे वाचा: Dadasaheb Phalke Award: ‘रेखाच अधिक सुंदर..’, आलिया-रेखा यांच्या VIRAL VIDEO वर कमेंट्सचा वर्षाव ) दरम्यान ट्रेड एक्सपर्ट उमेर संधूने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक बातमी शेअर केली आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. मलायका आणि अर्जुनचा फोटो शेअर करत उमेरने लिहलंय की, ‘ब्रेकिंग न्यूज, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुढील आठवड्यात पॅरिसमध्ये साखरपुडा करणार आहेत.‘या ट्विटनंतर मलायका-अर्जुन सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड करत आहेत. मलायका आणि अर्जुनच्या पॅरिसमध्ये पार पडणाऱ्या साखरपुड्यामध्ये काही खास लोक सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच हे जोडपं मार्चमध्ये लग्न करण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. परंतु याबाबत मलायका आणि अर्जुनकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

News18लोकमत
News18लोकमत

अर्जुन कपूरला डेट करण्यापूर्वी मलायका अरोराने सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खानसोबत 1998 मध्ये लग्न केलं होतं. 2017 मध्ये या दोघांनी घटस्फोट करत सर्वांनाच धक्का दिला होता. तर दुसरीकडे अर्जुन कपूरने मलायकाची नणंद अर्पिता खानला डेट केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात