जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Majhi Tujhi Reshimgath : प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार; अखेर नेहा आणि यश समोरासमोर येणार

Majhi Tujhi Reshimgath : प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार; अखेर नेहा आणि यश समोरासमोर येणार

माझी तुझी रेशीमगाठ

माझी तुझी रेशीमगाठ

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत नेहा नव्या रूपात परतली. यामुळे प्रेक्षकांच्या गोंधळ सुरु असताना मालिकेत आता पुन्हा नवा ट्विस्ट बघायला मिळणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 नोव्हेंबर: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ सध्या रंजक वळणावर आहे. या मालिकेची नायिका नेहा कामत हिचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. नेहाच्या मृत्यूनंतर चौधरी कुटुंबात मोठी उलथापालथ झाली आहे. परी आणि यशच नव्हे तर आजोबा, संपूर्ण चौधरी कुटुंबीय, शेफाली या सर्वांच्याच आयुष्यावर याचाा परिणाम होत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या कार अपघातात नेहा जंगलात गायब झालेली. तिचा शोध घेण्यात आला. पण ती सापडली नाही. त्यानंतर दरीत कोसळून मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. पण नेहाच नव्या रूपात परतली. यामुळे प्रेक्षकांच्या गोंधळ सुरु असताना मालिकेत आता पुन्हा नवा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर मालिकेचा नवा प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये आता यश आणि नेहा म्हणजेच नव्या रूपातील अनुष्का समोरासमोर येणार आहेत. प्रोमोमध्ये कंपनीची डील चालली असते तेव्हा यश तिथेच असतो. आता तिथे अनुष्का देखील येणार आहे. नेहाला समोर पाहून यशला चांगलाच धक्का बसणार आहे. यश आणि नेहाची अनेक वेळा चुकामुक झाली. प्रेक्षकांना टी कधी समोरासमोर येणार याचीच उत्सुकता होती. पण आता त्यांची प्रतीक्षा संपणार असून अखेर यश अनुष्काला पाहणार आहे. पण त्याला जरी ती नेहा वाटत असली तरी ती आता अनुष्का आहे. त्यामुळे ती यशला ओळखत नाही. आणि तशीच पुढे जाते. हेही वाचा - प्रार्थना बेहेरेचा रोमँटिक अंदाज; लग्नाला 5 वर्ष होताच नवऱ्यासाठी शेअर केला खास VIDEO मालिकेत याआधी समीरने देखील अनुष्काला पाहिलं आहे. तो रेस्टोरंट मध्ये तिला पाहतो. पण तिचा बदलेला पेहराव आणि गुजराती बोली ऐकून ही  आपली नेहा नाही याची खात्री त्याला पटते. आता यश देखील अनुष्काला पाहणार आहे. नेहमी साडी किंवा पंजाबी ड्रेसमध्ये दिसणाऱ्या नेहाला वेस्टर्न फॉर्मल्समध्ये पाहून यशला चांगलाच धक्का बसणार आहे.

जाहिरात

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नेहाच्या मृत्यूनंतर वर्षभराने चौधरी कुटुंबियांचे काय झाले, हे दाखवण्यात आले आहे. आता कुठे सगळेजण नेहाच्या मृत्यतून सावरत आहेत. यश परीला उत्साहित करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण नेहाच्या जाण्याने परी पार कोलमडून गेली आहे. तिला खाण्यापिण्यातही स्वारस्य राहिलेले नाही. पण ती या सगळ्यातून हळूहळू बाहेर येत असताना आता पुन्हा यशच्या समोर नेहाच्या येण्याने मालिकेला नवीन वळण येणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

काही दिवसांपूर्वी परीच्या शाळेतील भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये परी तिच्या आईविषयी बोलताना दिसते आहे. या व्हिडिओनंतर परीची भूमिका करणाऱ्या मायरा वायकुळचे  विशेष कौतुक झाले. परीचा अभिनय पाहून डोळ्यात पाणी आले अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी केल्या.  मालिकेत आलेल्या नवीन ट्विस्टमुळे माझी तुझी रेशीमगाठ  मालिकेने टीआरपी रेटिंगमध्ये चांगलीच बाजी मारली आहे. मालिका सध्या टॉप ५ मालिकांच्या यादीत दाखल झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात