मुंबई, 14 नोव्हेंबर: मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे . प्रार्थनाने अनेक चित्रपटांतून आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. सध्या ती ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत नेहाची भूमिका साकारत आहे. कायमच चर्चेत असणारी प्रार्थना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी ती एका खास कारणामुळे चर्चेत आहे. प्रार्थना बेहेरेनं नवऱ्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रार्थना बेहेरेच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले आहेत. प्रार्थना आणि अभिषेकच्या लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने नवऱ्यासोबतच्या काही खास क्षणांचा व्हिडीओ बनवून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत प्रार्थना म्हणाली, ‘आनंदी पाच वर्षे’. या व्हिडीओला तिनं ‘ना कोई था ना कोई है’ हे गाणं अॅड केलं आहे. या व्हिडीओमध्ये प्रार्थना आणि अभिषेकचे खास क्षण पहायला मिळत आहे. दोघे एकमेकांची साथ किती एन्जॉय करतात हे या व्हिडीओवरुन पहायला मिळतंय.
अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने 2017 मध्ये दिग्दर्शक अभिषेक जावकरबरोबर लग्नगाठ बांधली. प्रार्थना आणि अभिषेकचं अरेंच मॅरेज आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर यांना ओळखले जाते. प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर यांचा विवाह 14 नोव्हेंबर 2017 रोजी झाला होता. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे.
दरम्यान, प्रार्थना मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं अनेक उत्तम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सध्या ती माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून नेहा कामत म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. या मालिकेमुळेही प्रार्थनाची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. प्रार्थना सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. विविध फोटो व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट असतात.