मुंबई, 29 जून: झी मराठीवरील
( Zee Marathi) माझी तुझी रेशीमगाठ
( Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून चर्चेत आहे. मालिका प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. यशवर्धन चौधरी म्हणजेच श्रेयस तळपदे
( Shreyas Talpade) आणि नेहा कामत म्हणजे प्रार्थना बेहेरे
( Prarthana Behre) यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना अतिशय आवडली आहे. मालिकेत नुकतचं यश आणि नेहाचं
( Yash Neha) लग्न धुमधडाक्यात पार पडलं. त्यानंतर आता मालिकेत यश आणि नेहाचा रोमान्सही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. लग्नानंतर यश आणि नेहाचे प्रेम, नातं हळूहळू खुलताना पाहायला मिळत आहे. मालिकेचा एक प्रोमो सध्या व्हायरल होतोय. ज्यात नेहा यशला खास स्वीट डिश देताना दिसतेय. सध्या सोशल मीडियावर हा प्रोमो चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी कमेंट्स करत 'आम्हालाही अशीच बायको पाहिजे' असं म्हटलं आहे.
झी मराठीने नुकत्याच प्रदर्शित केलेल्या प्रोमोमध्ये यश आणि नेहा एकमेकांसोबत रोमँटिक क्षण घालवत असलेले बघायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये नेहा यशसाठी ऑफिसमध्ये डबा घेऊन जाते. तेव्हा यश तिला 'काही स्वीट डिश नाही आणलीस का?', असं विचारतो. नेहा नाही म्हणताच यश तिला 'एक स्वीट डिश आहे' असं म्हणत गालावर किस देण्याची मागणी करतो.
हेही वाचा -
कहाणीत ट्विस्ट! जयदीप नाही गौरी आहे माई दादांची लेक; अम्मा उलगडणार शिर्केपाटलांचं मोठं सत्य
त्यामुळे मालिकेच्या येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना यश आणि नेहाचा रोमान्स बघायला मिळणार आहे. मालिकेत सुरू असलेल्या या ट्रॅकला प्रेक्षकांनीही पसंती दर्शवली आहे. सोशल मीडियावर नेहा यशच्या या रोमँटिक सीनवर कमेंट्स करत प्रेमाचा वर्षाव केलाय.
यश आणि नेहाचं प्रेम बहरत असताना खलनायक म्हणून मालिकेत एन्ट्री केलेल्या नेहाच्या पहिला नवाऱ्यामुळे मालिकेत काय काय नवीन ट्विस्ट येणार याचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. परंतू सध्या सुरू असलेल्या रोमँटिक ट्रॅकमुळे मालिकेला वेगळं वळण दिलं आहे. तर दुसरीकडे आजोबांनी नेहावर कंपनीची सोपवलेली जबाबादारी देखील नेहा उत्तमरित्या पार पाडताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.