मुंबई, 29 जून: स्टार प्रवाह वाहिनीवरील ( Star Pravah) ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ( Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शिर्केपाटलांच्या घरात नवीन सत्य सर्वांसमोर उलगडणार आहे. त्यामुळे घरात मोठी उलथापालथ होणार आहे. नुकतेच जयदीप आणि गौरीच्या आयुष्यातील सगळी संकटं संपली होती आणि दोघांच्याही नव्या नात्याची सुरुवात होती. परंतू पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात नव्या वादळाची एन्ट्री झाली आहे. शिर्के पाटलांच्या घरातील सगळीच मंडळी महत्त्वाची आहेत. त्यातही अम्मा या घरच्या नसूनही अगदी घरातल्या व्यक्तीसारख्या आहेत. याच अम्मा शिर्केपाटलाच्या घरातील मोठं सत्य सगळ्यांसमोर उलगडताना दिसणार आहेत. मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला असून मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत गौरी तिच्या खऱ्या रुपात परतली आहे. अनिल आणि मानसी यांना शिक्षा झाल्याचेही दाखवण्यात आलं आहे. यादरम्यान शिर्केपाटील कुटुंबासमोर आणखी एक धक्कादायक सत्य समोर आल्याचं मालिकेच्या प्रोमोतून समोर आलं आहे. मालिकेच्या मागील भागात आपण पाहिलं, शिर्के-पाटलांच्या घरात रात्रीच्या वेळी रंगनाथ घरात घुसतो आणि आणि गौरीचा पाठलाग करतो.
हेही वाचा - TV अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; कामाच्या मोबदल्यात झालेली शरीरसुखाची मागणी या आधीही त्याने गौरीला गाठण्याचा प्रयत्न केला होता. आता तो थेट शिर्के-पाटलांच्या वाड्यात शिरून गौरीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. गौरी त्याला चोर समजते आणि आरडाओरड करते. तेवढ्यात रंगनाथ गौरीच्या कानात काहीतरी पुटपुटतो आणि तिथून पळ काढतो. गौरीला त्याने काय सांगितलं हे स्पष्ट कळत नाही. मात्र, त्यात त्याने घेतलेलं अम्माचं नाव ऐकून, या प्रकरणाशी अम्माचा नक्कीच काहीतरी संबंध असावा, असा अंदाज गौरी बांधते. यानंतर ती या गोष्टीबद्दल अम्माला विचारणा करते. मात्र, अम्मा तिला उत्तर देणं टाळते. अम्मा सांगणार सत्य! मालिकेमध्ये हे सत्य उलगडणारा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यानुसार जयदीप अम्माला सर्वांसमोर सत्य सांगण्याच हि विनंती करत आहे. अम्मा सांगते कि, ‘जयदीप हा माई आणि दादासाहेबांचा मुलगा नाही. तो सूर्यकांतचा मुलगा आहे. तर, गौरी ही दादा आणि माईंची पोटची मुलगी आहे’. हे सत्य ऐकून आता माई-दादांसह घरातील सगळ्यानांच मोठा धक्का बसणार आहे. रंगनाथने मरताना जयदीपला हे सत्य सांगितलं आहे. हे सत्य ऐकल्यानंतर शिर्के-पाटलांच्या पायाखालची जमीनच सरकते. सत्याच्या खुलाशामुळे जयदीप-गौरीसह संपूर्ण शिर्के-पाटलांच्या आयुष्यात मोठं वादळ निर्माण होणार आहे. आता हे सत्य कळल्यानंतर, मालिकेत पुढे नेमकं काय घडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

)







