मुंबई, 16 एप्रिल: महिमा चौधरी ही नव्वदीच्या दशकातील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिट चित्रपटही दिले आहेत. ही अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिली. या अभिनेत्रीने कॅन्सरशी झुंज दिली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेते अनुपम खेर यांनी महिमा चौधरी कॅन्सरशी झुंज देत असल्याचं सांगितलं होतं. पण आता ही अभिनेत्री कॅन्सरमुक्त झाली असून चित्रपटसृष्टीत देखील परतली आहे. महिमा येणाऱ्या काळात कंगनाच्या इमर्जन्सी मध्ये दिसणार आहे. पण नुकताच तिने कपिल शर्मा विषयी केलेल्या खुलाश्याने ती चर्चेत आली आहे. अलीकडेच महिमा चौधरी अभिनेत्री प्रसिद्ध टीव्ही शो द कपिल शर्मा शोमध्ये पोहोचली होती. यादरम्यान तिच्यासोबत मनीषा कोईरालाही दिसली. या शोदरम्यान दोघी अभिनेत्रींनी खूप मजा केली आणि तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. तसेच, तिने सांगितले की, कपिल शर्माने तिच्या कॅन्सरच्या वाईट काळात खूप मदत केली होती.
खरंतर, महिमा चौधरीने कपिल शर्मा शोमध्ये तिच्या कॅन्सरच्या गंभीर आजाराबद्दल खुलासा केला. तिने सांगितले की, कपिल शर्माने तिच्या आजारपणात खूप मदत केली होती. तिने सांगितले की ती कॅन्सरच्या काळात कपिल शर्मा शो कशी पाहायची आणि त्यामुळे तिला त्यातून बरे होण्यात खूप मदत झाली. त्या काळात कपिलचा शो तिच्यासाठी खूप उपयुक्त ठरला, असे अभिनेत्रीने सांगितले. ‘द कपिल शर्मा शो’लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; शो तडकाफडकी बंद होण्याचं काय आहे कारण? महिमा म्हणाली की, ‘कपिल माझ्या उत्तम तब्येतीचे कारण तूच आहेस. काही काळापूर्वी मला कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते, त्यामुळे मला फक्त आणि फक्त कॉमेडी शोज बघायचे होते, जेणेकरून मी सर्वकाही विसरून आनंदी राहू शकेन. तो आनंद आतून येऊ शकतो, मी मनमोकळेपणाने हसू शकते, हा आनंद मला तुझा कार्यक्रम पाहून मिळायचा. या आजारातून मला कधी झोप लागली आणि केव्हा जाग आली ते मलाही कळलं नाही.’ तिच्या या खुलाश्याने चाहते कपिलचं कौतुक करत आहेत. महिमा चौधरीप्रमाणेच मनीषा कोईराने देखील कॅन्सरशी झुंज दिली आहे. मनीषानेही दीर्घकाळ कर्करोगावर उपचार घेतले होते. या शोदरम्यान मनीषानेही खूप धमाल केली. मनीषा याआधीही कपिल शर्माच्या शोमध्ये सहभागी झाली आहे. या दोन्ही अभिनेत्रीचं चाहत्यांना कौतुक आहे.दरम्यान कपिल शर्माचा हा शो लवकरच चाहत्यांचा निरोप घेणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘द कपिल शो’ चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. या शोचा प्रवास दोन वेगवेगळ्या वाहिन्यांवर पाहायला मिळाला. पण आता हा शो तात्पुरता बंद होणार आहे.