नैना गांगुली ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. यावेळी देखील तिने असेच काही स्वत:चे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंवर चक्क पाकिस्तानातून देखील कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तुझ्या इतकी सुंदर तरुणी पाहिली नाही असं म्हणत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं जात आहे.