मुंबई 28 मे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Swatantryaveer Sawarkar) जयंतीदिनीच त्यांच्यावरील एका मोठ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) हा चित्रपट घेऊन येणार आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली.
स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Sawarkar) यांची आज जयंती आहे या निमित्त त्यांना अनेकांकडून मानवंदना देण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या समवेत अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली. तर त्यांच्या वरील एका चित्रपटाची दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घोषणा केली आहे. संदीप सिंग (Sandeep Singh)हे चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. त्यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली.
चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत यासोबतच ते चित्रपटाचं लिखाण देखिल करणार आहेत. संदीप सिंग यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. यासोबतच एक कॅप्शन ही लिहिल आहे. या कॅप्शन मध्ये ते लिहीतात, ‘स्वातंत्र्याच्या इतिहासाची संपूर्ण गोष्ट जाणून घेणं अजून बाकी आहे. भेटा स्वांतत्र्यवीर सावरकरांना लवकरच.’
‘सलमानकडून अशा चित्रपटाची अपेक्षा नव्हती’; Radhe पाहून सलिम खान झाले नाराज
View this post on Instagram
पुढे त्यांनी लिहीलं आहे, ‘स्वातंत्र्यावीर सावरकरांची निंदा आणि कौतुक दोन्ही होत. त्यांच्या प्रतिमेचं फार ध्रुवीकरण करण्यात आलं आहे. याचं कारण लोकांना अजूनही त्यांच्याविषयी माहिती नाही. पण या गोष्टीला कोणीच नकार देऊ शकत नाही ती म्हणजे की ते स्वतंत्रता चळवळीचे मुख्य भाग होते. आमचा त्यांच्या जीवनावर, प्रवासावर दृष्टीक्षेप टाकण्याचा एक प्रयत्न आहे.’
महेश मांजरेकर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, “मी सावरकरांच्या जीवनाने खूप प्रभावित झालेलो आहे. आणि एक दिग्दर्शक म्हणून माझ्यासाठी इतक्या मोठ्या व्यक्तिच्या जीवनावर चित्रपट करणं म्हणजे मोठ आव्हान आहे.”
त्यामुळे आता प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुता आहे पण चित्रपटातील मुख्य कलाकार तसेच आणखी कोणतीही बातमी उघड करण्यात आली नाही. तेव्हा आता सावरकरांच्या भूमिकेसाठी नक्की कोणाची वर्णी लागते हे पाहण औत्सुक्याचं ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment