मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘सलमानकडून अशा चित्रपटाची अपेक्षा नव्हती’; Radhe पाहून सलिम खान झाले नाराज

‘सलमानकडून अशा चित्रपटाची अपेक्षा नव्हती’; Radhe पाहून सलिम खान झाले नाराज

सलमानचे वडील सलिम खान (Salim Khan) यांनी देखील राधे पाहून आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा काही चांगला चित्रपट नव्हता अशी रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सलमानचे वडील सलिम खान (Salim Khan) यांनी देखील राधे पाहून आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा काही चांगला चित्रपट नव्हता अशी रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सलमानचे वडील सलिम खान (Salim Khan) यांनी देखील राधे पाहून आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा काही चांगला चित्रपट नव्हता अशी रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

मुंबई 28 मे: सलमान खानचा (salman khans) राधे (Radhe) हा मोस्ट वॉण्टेड चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांनी सलमानच्या ढासू अॅक्शन सीनवर कौतुकाचा वर्षाव केला. तर टीकाकारांनी जोरदार खिल्ली उडवत भाईजानला ट्रोल केलं. आता सलमानचे वडील सलिम खान (Salim Khan) यांनी देखील राधे पाहून आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा काही चांगला चित्रपट नव्हता अशी रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सलिम खान हे बॉलिवूडमधील नामांकित पटकथा लेखक, दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर शोले, दीवार, डॉन, जंजीर, मिस्टर इंडिया यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांच्या पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. या पार्श्वभूमीवर राधे पाहिल्यानंतर ते काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचेच लक्ष होते. परंतु त्यांनी आपल्या मुलाच्या मोहात न पडता एक समिक्षक म्हणून आपली तटस्थ प्रतिक्रिया दिली.

‘माझ्यासोबत झोप मी तुला काम देतो’; अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “राधे हा ठिक ठाक चित्रपट होता. पण याची तुलना बजरंगी भाईजान किंवा दबंगशी करता येणार नाही. एक मसाला चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला. पण तो प्रयत्न फसला आहे. राधे हा सलमानच्या आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे असं मला वाटत नाही. सलमाननं आपल्या चाहत्यांना असं निराश करु नये” अशी रोखठोक प्रतिक्रिया सलिम खान यांनी दिली.

राधे हा सलमानच्या कारकिर्दीतील आजवरचा सर्वात फ्लॉप चित्रपट ठरला आहे. IMDB वर तर या चित्रपटाला 10 पैकी केवळ 1.2 स्टार मिळाले आहेत. बहुतांशी प्रेक्षकांनी या चित्रपटावर टीकाच केली आहे. हा चित्रपट कुठल्याच पातळीवर वॉण्टेडचा सिक्वल वाटत नाही. असं मत अनेक चाहत्यांनी देखील व्यक्त केलं. आता चाहते सलमानच्या पुढच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

First published:
top videos

    Tags: Salman khan