मुंबई, 15 नोव्हेंबर : साऊथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबूवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेश बाबूचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते कृष्णा यांचं निधन झालं आहे. दोन महिन्यांपूर्वीच आई इंदिरा देवी यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आज वडिलांचं निधन झालं आहे. त्यामुळे मनोरंजन सृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. महेश बाबू यांचे वडील कृष्णा यांचं वयाच्या 80 वर्षी सोमवारी पहाटे निधन झालं. मध्यरात्री 1.15 वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे त्यांना हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात आणण्यात आले होते. (Sunil Shende : ‘वास्तव’ फेम ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड; मराठीसह हिंदी चित्रपटात कमावलं नाव) कृष्ण हे अभिनेते महेश बाबू यांचे वडील आणि टीडीपी नेते जय गल्ला यांचे सासरे होते. 1980 च्या दशकात ते काँग्रेसमध्ये सामील झाले आणि खासदार झाले पण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर त्यांनी राजकारण सोडले.
त्यांची पत्नी आणि महेश बाबू यांची आई इंदिरा देवी यांचे या वर्षी सप्टेंबरमध्ये निधन झाले. त्यांचा मोठा मुलगा रमेश बाबू यांचे जानेवारीत निधन झाले. त्यांची दुसरी पत्नी असलेल्या अभिनेत्री विजया निर्मला यांचे 2019 मध्ये निधन झाले होते. महेश बाबूची आई इंदिरा देवी या आजारी होत्या.हैद्राबादमधील एआयजी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही दिवसांपासून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. गेल्या महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर अभिनेता महेश बाबू अनेकवेळा आपल्या आईला भेटण्यासाठी रुग्णालयात आलेला पाहण्यात आलं होतं. (आलिशान घर, कोट्यवधीच्या गाड्या; पाहा सुपरस्टार महेश बाबूची थक्क करणारी संपत्ती) सुपरस्टार कृष्णा यांनी इंदिरा देवी यांच्यापासून विभक्त होत विजयनिर्मलाशी लग्न केलं होतं. त्यानंतर इंदिरा देवी या एकट्याचा राहिल्या होत्या. त्यांनी पुन्हा लग्न केलं नाही. महेश बाबू आणि त्यांच्या आईमध्ये फारच छान बॉन्डिंग होतं. अभिनेता सतत सोशल मीडियावरुन आपल्या आईबाबतचं प्रेम आणि आपुलकी व्यक्त करत असे. अभिनेत्याच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक दुःख येत आहेत. काही दिवसांपूर्वी महेश बाबू यांचा मोठा भाऊ रमेश बाबू यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आता त्यांच्या आईचं निधन झालं आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.