मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Mahesh Babu Birthday : आलिशान घर, कोट्यवधीच्या गाड्या; पाहा सुपरस्टार महेश बाबूची थक्क करणारी संपत्ती

Mahesh Babu Birthday : आलिशान घर, कोट्यवधीच्या गाड्या; पाहा सुपरस्टार महेश बाबूची थक्क करणारी संपत्ती

महेश बाबूच्या वाढदिवसानिमित्त आज सर्वत्र महेश बाबूवर शुभेच्छा वर्षाव होताना दिसत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेश बाबूविषयी आज काही खास गोष्टी जाणून घेऊया.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 9 ऑगस्ट : दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या अभियाची छाप सोडणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे महेश बाबू (Mahesh Babu Birthday). महेश बाबू आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अशातच आज महेश बाबूचा वाढदिवस असून महेश बाबू 47 वर्षाचा पूर्ण झाला आहे. महेश बाबूच्या वाढदिवसानिमित्त आज सर्वत्र महेश बाबूवर शुभेच्छा वर्षाव होताना दिसत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेश बाबूविषयी आज काही खास गोष्टी जाणून घेऊया. महेश बाबूची गणना साऊथ सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. आपल्या स्टारडममुळे महेश आज करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. महेश त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी 20 ते 25 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम घेतो. यासोबतच तो जाहिरातींमधूनही मोठी कमाई करतो. महेश बाबूची एकूण संपत्ती 244 कोटी रुपये आहे. हेही वाचा -  अंकिता लोखंडेचं बाथटबमध्ये PHOTOSHOOT, मादक अदांवर चाहते फिदा महेश बाबूकडे असणाऱ्या गाड्यांची किंमत एकूण जवळपास 9 कोटी रुपये आहे. महेश बाबू स्वतःची कंपनीही चालवतो. त्याचे एक प्रोडक्शन हाऊस आहे. याशिवाय तो महेश बाबू एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचा ​​मालक आहे. महेश बाबूचे हैदराबादमधील जुबली हिल्स येथे आलिशान घर आहे. या घराची किंमत 28 कोटी रुपये आहे. या घरासोबतच त्याचे बंगळुरूमध्ये करोडो रुपयांचे घरही आहे. हेही वाचा -  Kareena Kapoor: 'लाल सिंह चड्ढा'च्या प्रमोशनसाठी पतौडी बेगमचा ट्रेडिशनल लुक, करीनावर चाहते फिदा महेश बाबूचा वाढदिवस खास बनवण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी आणि निर्मात्यांनी त्याचा 'पोकिरी' चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचं ठरवलं आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित पोकिरी हा चित्रपट महेश बाबूच्या चित्रपट कारकिर्दीतील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. या चित्रपटात दिग्दर्शकाने महेश बाबूची ओळख पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने करून दिली. जो गुंडासारखा दिसतो पण नंतर तो पोलीस अधिकारी ठरतो. याच चित्रपटाचा हिंदीत वॉन्टेड म्हणून रिमेकही करण्यात आला होता. महेश बाबूचा पोकिरी पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं समजताच त्याच्या चाहत्यांमध्ये मोठा आनंद पसरला आहे. महेश बाबू स्टारर या चित्रपटाच्या रि-रिलीजची कमाई अभिनेत्याच्या एनजीओला दान केली जाणार आहे. प्रेक्षकांचा उत्साह पाहता चित्रपट पुन्हा प्रदर्शित होण्याआधीच तिकीट बुकिंगसाठी मोठा प्रतिसाद दिसतोय.
First published:

Tags: Birthday celebration, Mahesh babu, Social media, South indian actor

पुढील बातम्या