मुंबई, 15 नोव्हेंबर: साऊथ सुपरस्टार महेश बाबू चे वडील कृष्णा घट्टमनेनी यांनी मंगळवारी (15 नोव्हेंबर) सकाळी या जगाचा निरोप घेतला. हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात मंगळवारी पहाटे 4 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कृष्णा घट्टमनेनी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महेश बाबूचे वडील कृष्णा हे प्रसिद्ध तेलुगू अभिनेते होते. त्यांना इंडस्ट्रीत सुपरस्टार कृष्णा म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. हेही वाचा - Mahesh Babu Birthday : आलिशान घर, कोट्यवधीच्या गाड्या; पाहा सुपरस्टार महेश बाबूची थक्क करणारी संपत्ती अभिनय कारकीर्द महेश बाबूचे वडील कृष्णा हे तेलुगू फिल्म इंडस्ट्रीचे मोठे स्टार होते. कृष्णा यांचे खरे नाव घट्टमनेनी शिव रामा कृष्णमूर्ती आहे. चित्रपटसृष्टीत आल्यावर त्यांनी कृष्णा हे नाव चित्रपटांसाठी ठेवलं. अदुर्थी सुब्बा राव दिग्दर्शित ‘थेने मनसुलु’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. आपल्या 5 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 350 चित्रपटांमध्ये काम केले. कृष्णाला पद्मविभूषणनेही गौरविण्यात आले. कृष्णा घट्टमनेनी यांनी पद्मालय फिल्म्स नावाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील सुरु केले होते. या प्रोडक्श हाऊसअंतर्गत त्यांनी अग्नि परिक्षा, अल्लुरी सीताराम राजू, मोसागल्लाकू मोसागडू पंडंती कपूरम, देवुडू चेसिना मनुशुलु आणि अल्लुरी सीताराम राजू यासारख्या अनेक चित्रपट बनवले. काही काळानंतर त्यांनी त्यांची दुसरी पत्नी विजया निर्मला यांच्यासोबत विजया कृष्णा चित्रपट ही दुसरी चित्रपट निर्मिती कंपनी सुरू केली. मीना आणि देवदासू, अल्लुरी सीतारामराजू आणि मोसागल्लाकी मोसागडू यांसारख्या काही संस्मरणीय नाटकांना त्यांनी आर्थिक मदत केली.
कृष्णा हे एक उत्कृष्ठ अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक यासोबतच राजकारणीही होते. त्यांचा नेहमीच काँग्रेस पक्षाकडे कल होता. 1898 मध्ये ते काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले होते.
निवृत्ती प्रसिद्ध कारकीर्दीनंतर, कृष्णा घट्टामनेनी यांनी डिसेंबर 2012 मध्ये आपण चित्रपट आणि राजकारण या दोन्हींमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. पद्मभूषण, एनटीआर राष्ट्रीय पुरस्कार, आणि आंध्र विद्यापीठातून डॉक्टरेट यांसारख्या त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. दरम्यान, हे वर्ष महेश बाबूसाठी कठीण होते. या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांचा भाऊ रमेश बाबू यांचे निधन झाले. त्यानंतर त्याच वर्षी त्यांनी त्यांची आई इंदिरा देवी गमावली. इंदिरा देवी यांना वयाशी संबंधित आजार होता. त्यांच्यावर हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने सप्टेंबरमध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला.