मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

पुन्हा एकदा रिलीज होणार महेश बाबूचा 'हा' चित्रपट; सुपरस्टारच्या चाहत्यांनी रचला नवा इतिहास

पुन्हा एकदा रिलीज होणार महेश बाबूचा 'हा' चित्रपट; सुपरस्टारच्या चाहत्यांनी रचला नवा इतिहास

महेश बाबूनं त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं आहे. त्याचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. अशातच महेश बाबूसाठी क्रेझी असलेल्या चाहत्यांनी नवा इतिहास रचल्याचं समोर आलं आहे.

    मुंबई, 9 ऑगस्ट : 'प्रिन्स ऑफ टॉलिवूड' म्हणून ओळखला जाणारा दाक्षिणात्य अभिनेता म्हणजे महेश बाबू (Mahesh Babu Birthday). महेश बाबूचा आज 9 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. महेश बाबू 47 वा वाढदिवस साजरा करत असून त्याच्यावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महेश बाबूनं त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं आहे. त्याचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. अशातच महेश बाबूसाठी क्रेझी असलेल्या चाहत्यांनी नवा इतिहास रचल्याचं समोर आलं आहे. महेश बाबूचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पोकिरी' पुन्हा प्रदर्शित करण्याची मागणी महेश बाबूच्या चाहत्यांनी केली होती. अशातच महेश बाबूचा वाढदिवस खास बनवण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी आणि निर्मात्यांनी त्याचा 'पोकिरी' चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचं ठरवलं आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित पोकिरी हा चित्रपट महेश बाबूच्या चित्रपट कारकिर्दीतील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. या चित्रपटात दिग्दर्शकाने महेश बाबूची ओळख पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने करून दिली. जो गुंडासारखा दिसतो पण नंतर तो पोलीस अधिकारी ठरतो. याच चित्रपटाचा हिंदीत वॉन्टेड म्हणून रिमेकही करण्यात आला होता. यामध्ये सलमान खान झळकला होता. हेही वाचा -  Laal Singh Chaddha: कसा आहे आमिरचा 'लाल सिंह चढ्ढा', साऊथ सुपरस्टार नागार्जुननं शेअर केलं खास TWEET महेश बाबूचा पोकिरी पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं समजताच त्याच्या चाहत्यांमध्ये मोठा आनंद पसरला आहे. महेश बाबू स्टारर या चित्रपटाच्या रि-रिलीजची कमाई अभिनेत्याच्या एनजीओला दान केली जाणार आहे. प्रेक्षकांचा उत्साह पाहता चित्रपट पुन्हा प्रदर्शित होण्याआधीच तिकीट बुकिंगसाठी मोठा प्रतिसाद दिसतोय. या चित्रपटाचे जवळपास 135 शो होणार आहेत. त्यामुळे महेश बाबूच्या चाहत्यांमध्ये भला मोठा उत्साह पहायला मिळतोय. दरम्यान, महेश बाबूचं लग्न अभिनेत्री नम्रता शिरोजकर हिच्यासोबत झालं आहे. दोघांनी 10 फेब्रुवारी 2005 रोजी लग्न केलं. महेश बाबूने नम्रतासोबत लग्न करण्यापूर्वी एक अट ठेवली होती 'लग्नानंतर ती चित्रपटात काम करणार नाही'. नम्रताने ही अट मान्य करून महेश बाबूशी लग्न केले. दोघांनाही आता एक मुलगा आणि एक मुलगी  आहे.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Birthday celebration, Mahesh babu, South indian actor

    पुढील बातम्या