मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Laal Singh Chaddha: कसा आहे आमिरचा 'लाल सिंह चढ्ढा', साऊथ सुपरस्टार नागार्जुननं शेअर केलं खास TWEET

Laal Singh Chaddha: कसा आहे आमिरचा 'लाल सिंह चढ्ढा', साऊथ सुपरस्टार नागार्जुननं शेअर केलं खास TWEET

Laal Singh Chaddha

Laal Singh Chaddha

लाल सिंह चढ्ढाविषयी दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुननं प्रतिक्रिया दिली आहे. हा चित्रपट पाहिल्यावर काय वाटलं याविषयी नागार्जुननं खास ट्विट शेअर केलंय.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 9 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आमिर खान त्याचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चढ्ढा' (Laal Singh Chaddha) मुळे चांगलाच चर्चेत आला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पहायला मिळतोय. सोशल मीडियावर लाल सिंग चड्ढा चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात यावा असं सुरू आहे, तरीही ही जबरदस्त अॅडव्हान्स बुकिंग दिसून येत आहे. चित्रपटातील काही जुन्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चित्रपट वादात सापडलाय. अशातच लाल सिंह चढ्ढाविषयी दाक्षिणात्य सुपस्टार अभिनेता नागार्जुननं प्रतिक्रिया दिली आहे. 'लाल सिंह चढ्ढा' चित्रपटाच्या काही स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आल्या होत्या. एसएस राजामौली, नागार्जुन, सुकुमार आणि चिरंजीवी यांसारख्या दिग्गज कलाकारांसाठी या विशेष स्क्रिनिंग होत्या. हा चित्रपट पाहिल्यानंतर नागार्जुननं प्रतिक्रिया दिली आहे. नागार्जुननं ट्विटरवर हा चित्रपट कसा वाटला याविषयी पोस्ट शेअर केली आहे. ट्विट करत नागार्जुननं म्हटलं की, 'लाल सिंह चढ्ढा' चित्रपट पाहिल्यानंतर मोकळ्या हवेत श्वास घेतल्यासारखं वाटलं. साधा आणि सरळ वाटणाऱ्या या चित्रपटाचा अर्थ खूप खोल आहे. हा चित्रपट तुम्हाला हसवतो, रडवतो आणि विचार करायला भाग पाडतो. नागार्जुननं ट्विटमध्ये पुढे म्हटलं की, या चित्रपटातून एक साधा मेसेज मिळतोय की, प्रेम आणि निरागसतेनं जग जिंकता येतं. याशिवया नागार्जुननं त्याचा मुलगा नागा चैतन्यची कौतुक केलं आहे. नागा चैतन्यला एक अभिनेता म्हणून यशस्वी होताना पाहणं माझ्यासाठी खास आहे, असं नागार्जुननं म्हटलं. चित्रपट पाहिल्यानंतर दिग्दर्शक अद्वैत चंदन, लेखक अतुल कुलकर्णी आणि टीम, तुम्ही सर्वांनीच आमची मनं जिंकली आहेत. हेही वाचा -  Pradeep Patwardhan Death: मराठीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन दरम्यान, आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर झळकणार आहे. आमिरच्या चित्रपटासोबतच अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ हा चित्रपटही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे कोणता चित्रपट चांगला ठरेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
First published:

Tags: Aamir khan, South indian actor, Twitter, Upcoming movie

पुढील बातम्या