मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Maharashtrachi Hasyajatra: हास्यजत्रेचं फॅन फॉलोईंग काही औरच! रसिका-चेतनाला आला प्रेक्षकांचा भन्नाट अनुभव

Maharashtrachi Hasyajatra: हास्यजत्रेचं फॅन फॉलोईंग काही औरच! रसिका-चेतनाला आला प्रेक्षकांचा भन्नाट अनुभव

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचा नवा सिझन भेटीला येणार असून कार्यक्रमातील दोन अभिनेत्री त्यांना प्रेक्षकांकडून आलेले अनुभव शेअर करताना दिसत आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचा नवा सिझन भेटीला येणार असून कार्यक्रमातील दोन अभिनेत्री त्यांना प्रेक्षकांकडून आलेले अनुभव शेअर करताना दिसत आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचा नवा सिझन भेटीला येणार असून कार्यक्रमातील दोन अभिनेत्री त्यांना प्रेक्षकांकडून आलेले अनुभव शेअर करताना दिसत आहेत.

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 09 ऑगस्ट: महाराष्ट्राची हास्यजत्रा सोनी मराठीवर पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मालिकेचे धमाल विनोदवीर पुन्हा एकदा सगळ्यांना हसवायला सज्ज झाल्याचं समजत आहे. (maharashtrachi hasyajatra fans reaction) कार्यक्रमाचा सेटसुद्धा नव्याने उभारला असून आता मोठ्या आणि सुटसुटीत जागेत आणखी धमाल करण्यासाठी सगळे हास्यजत्रेचे वीर सज्ज असल्याचं दिसत आहे. या कार्यक्रमाने अगदी कमी काळातच खूप मोठा चाहतावर्ग कमवला. सध्या कार्यक्रमातील दोन अभिनेत्री त्यांना प्रेक्षकांचा आलेला अनुभव शेअर करताना दिसत आहेत. नव्या सेटमध्ये नव्या जोशात टीम कामाला सुरुवात करताना दिसत आहे. यावेळी रसिका वेंगुर्लेकर आणि चेतना भट यांनी एका मुलाखतीत प्रेक्षकांचा मिळणार भन्नाट रिस्पॉन्स यावर भरभरून मत व्यक्त केलं आहे. हास्यजत्रेत रोज दिसणाऱ्या कलाकारांना जेव्हा प्रेक्षक भेटतात तेव्हा नेमके कसे रिऍक्ट होतात याबद्दल दोघी सांगतात, “आम्हाला या दोन महिन्याच्या काळातच अनेकांनी गाठून कार्यक्रम कधी सुरु करताय? असं विचारलं. तसंच अनेकदा प्रेक्षक भेटतात आणि असं काही विनोदी बोलून जातात की हसू आवरणं कठीण होतं.” हे ही वाचा- Pradeep Patwardhan passes away: 'पट्या मी तुला खुप मिस करणार यार'; प्रशांत दामले यांची भावुक पोस्ट रसिका असं सांगते, “एका साखरपुड्याच्या कार्यक्रमाला एक गृहस्थ भेटायला आले आणि भावनेच्या भरात आम्ही तुमचं सगळं बघतो आणि आम्हाला तुमचं सगळं खूप आवडतं अशी प्रतिक्रिया देऊन गेले. मी समजू शकते की त्यांना भेटून काय बोलावं सुचत नाही पण कधीतरी अशी प्रतिक्रिया मिळाली की हसू आवरणं कठीण होतं. अनेकजण मला मास्क लावला असेल तरी ओळखतात आणि काहींना माझं नाव पटकन आठवत नाही. पण सगळ्यांचं भरभरून मिळणारं प्रेम बघून छान वाटतं.” चेतना असं सांगते, “माझ्या एका पात्राची भुवया उडवायची स्टाईल एवढी प्रचलित झाली की एक गृहस्थ मला बघून अशाच भुवया उडवत होते. पहिले मी घाबरले पण त्यांनी येऊन नंतर सांगितलं की कार्यक्रम एन्जॉय करतात असंच एकदा आम्ही ग्रुपने कार्यक्रमाला गेलेलो तिथे एका मुलीने मी सोडून इतर सगळ्यांना ओळखलं आणि दोन मिनिटांनी तिला लक्षात आलं की मी हि टीमचा भाग आहे आणि तिला वाईट वाटलं. असे अनेक किस्से होत असतात पण प्रेक्षक एवढं आपलं समजतात हे फार सुंदर फीलिंग आहे.” हास्यजत्रेच्या टीमचा दंगा आणि कळलं एन्जॉय करायला प्रेक्षक आतुर झाले आहेत. येत्या काळात प्रेक्षकांना आवडलेले अनेक स्किट, संकल्पना आणि पात्र त्यांना पुन्हा बघता येणार आहेत.
First published:

Tags: Marathi entertainment, Sony tv

पुढील बातम्या