Home /News /entertainment /

Maharashtrachi Hasyajatra: हास्यजत्रेच्या टीमची धमाल ट्रिप; 5 जुलैला होणार नव्या सिझनचा श्रीगणेशा!

Maharashtrachi Hasyajatra: हास्यजत्रेच्या टीमची धमाल ट्रिप; 5 जुलैला होणार नव्या सिझनचा श्रीगणेशा!

प्रेक्षकांच्या अत्यंत जवळची असणारी महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajtra show) एका नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज आहे. एक आनंदाची बातमी म्हणजे येत्या काहीच दिवसात नव्या सिजनचं चित्रीकरण सुरु होणार आहे.

  मुंबई 2 जुलै: महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) हा सोनी मराठीवरील कार्यक्रम तुफान लोकप्रिय होता. गेले चार सिझन या कार्यक्रमाने प्रेक्षकांना टेन्शन विसरायला लावून केवळ शंभर टक्के मनोरंजन दिलं आहे. हास्यजत्रेतले हास्यवीर पुन्हा सगळ्या प्रेक्षकांना हसवायला सज्ज होणार आहेत, कारण महाराष्ट्राची हास्यजत्राचा नवा सीजन लवकरच सगळ्यांच्या भेटीला येणार (Maharashtrachi Hasyajatra new season) असल्याची बातमी समोर येत आहे. येत्या 5 जुलै पासून नव्या सिझनच्या शूटिंगला आरंभ होणार असल्याचं समजत आहे. हास्यजत्रेचं प्रत्येक पात्र रसिकांच्या जवळचं आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर कम्माल बॅटिंग करण्यात पटाईत आहे आणि त्यामुळेच हास्याचे षटकार सततच यात उडताना दिसत असतात. शूटिंग सुरु होण्याआधी हास्यजत्रेची सगळी टीम एका धमाल ट्रीपला गेल्याचे फोटो सध्या समोर येत आहेत. निर्माते सचिन मोटे, सचिन गोस्वामी आणि कार्यक्रमाची सगळी टीम लोणावळ्याच्या रिसॉर्टमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. समीर चौगुले (Samir Choughule) या हास्यजत्रेच्या खंद्या विनोदवीराने या ट्रिपचा खास फोटो शेअर करत निर्मात्यांचे, अमित फाळके यांचे आणि सोनी मराठी वाहिनीचे आभार मानले आहेत. या फोटोमध्ये टेक्निशियन पासून सगळी टीम मस्त ट्रीपला गेल्याचं समोर येत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  नम्रता आवटे-संभेराव (Namrata Sambherao) या अभिनेत्रीने सुद्धा पावसात धमाल करतानाचा एक विडिओ शेअर केला आहे. यात हास्यजत्रेच्या अभिनेत्री मिळून ‘नभ उतरू आलं’ हे गं म्हणताना दिसत आहेत.
  तसंच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या प्राजक्ता मुलीने सुद्धा काळ याबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. हास्यजत्रेची संपूर्ण टीम एका फॅमेलीसारखी आहे. सेटवर किंवा ऑफ स्क्रीनसुद्धा हे कलाकार कायम एकमेकांसोबत हँग आउट करताना दिसतात.
  हास्यजत्रेबद्दल सांगायचं तर या कार्यक्रमाने अगदी कमी काळात सॉलिड क्रेझ निर्माण केली आहे. प्रत्येक स्किटमध्ये वैविध्य जपण्यात टीम कायमच यशस्वी होताना दिसते. तसंच या कार्यक्रमाने अनेक पात्र प्रचंड फेमस केली आहेत. अगदी प्राजक्ताच्या वाह दादा वाह! पासून सईच्या जुजबी पर्यंत, नम्रताच्या लॉलीपासून प्रसादच्या गतिशील वेगेपुरेपर्यंत अनेक पात्रं, डायलॉग, पद्धती खूप लोकप्रिय झाल्या. हे ही वाचा- Sai Tamhankar: सईचं दौलतरावांवर प्रेम उतू; बर्थडे निमित्त बॉयफ्रेंडला दिल्या खास शुभेच्छा!
   काहीच दिवसांपूर्वी या कार्यक्रमाच्या चौथ्या सिजनच शूटिंग संपलं होतं पण प्रेक्षकांना सुद्धा या कार्यक्रमाने एवढं वेड लावेल आहे की ना प्रेक्षक ना कलाकारही कोणीच या कार्यक्रमापासून दूर ठेऊ शकत नाहीये. कोव्हीडच्या काळात ज्या कार्यक्रमाने अनेकांना आधार दिला अशा कार्यक्रमाच्या नव्या सिजनमध्ये काय धमाल पाहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्या फॅन्सना लागली आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Comedy, Marathi entertainment, Tv shows

  पुढील बातम्या