मुंबई, 3 फेब्रुवारी- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अभिनेत्रीने आपल्या लग्नाच्या चर्चांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अखेर काल वनिता बॉयफ्रेंड कलाकार सुमित लोंढेसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. वनिता आणि सुमितच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या लग्नात झक्कास उखाणा घेतला आहे. वनिताच्या उखाण्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वनिता खरात काल सुमित लोंढेसोबत लग्न बंधनात अडकली आहे. सोशल मीडियावर सर्वत्र या दोघांच्या लग्नची तुफान चर्चा सुरु होती. आता या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये दोघेही लाल आणि पांढऱ्या रंगाच्या पारंपरिक वेशभूषेत फारच सुंदर दिसत आहेत. वनिताच्या चेहऱ्यावर लग्नाचा ग्लो दिसून येत आहे. या दोघांच्या फोटोंवर चाहते आणि सेलिब्रेटी कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. **(हे वाचा:** Vanita Kharat Wedding: शुभमंगल सावधान! अखेर सुमितची झाली वनिता; लग्नाचे फोटो आले समोर ) सुमित आणि वनिताची गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरु होती. या दोघांनी लग्नाचा खुलासा तर केला होता मात्र लग्नाची तारीख जाहीर केली नव्हती. दरम्यान या दोघांनी आपल्या प्री वेडिंग, हळदी, मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने लग्नाची तारीख उघड झाली होती. अखेर काल २ फेब्रुवारीला या दोघांनी सात फेरे घेत जन्मभराचीगाठ बांधली आहे. वनिता आणि सुमितच्या लग्नाला हास्यजत्रेची संपूर्ण टीम उपस्थित होती. या टीमने लग्नात चार चांद लावत धम्माल केली आहे. मेहंदी, हळदीपासून ते लग्न रिसेप्शनपर्यंत सर्वच कार्यक्रमांत या कलाकारांनी धम्माल डान्स करत एन्जॉय केला आहे.
दरम्यान आता सोशल मीडियावर वनिता खरातच्या लग्नातील एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ फारच खास आहे. कारण यामध्ये नवरी बनलेली वनिता सुमितसाठी खास मराठी उखाणा घेताना दिसून येत आहे. वनिताने उखाणा घेत म्हटलंय, ‘टेन्शन रिलीज करायला शोधले मी फंडे सतरा…सुमित तूच माझा महाराष्ट्र … तूच माझी हास्यजत्रा’. हा उखाणा सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
वनिता खरात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. तिचा नवरा सुमित लोंढेदेखील याच कार्यक्राचा भाग आहे. या दोघांनी आपल्या प्री वेडिंगचे फोटो शेअर केले होते. यामध्ये दोघेही लिपलॉक करत रोमँटिक पोझ देताना दिसून आले होते.