जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Kedar Shinde: महाराष्ट्रात 'द केरळ स्टोरी' मोफत दाखवणाऱ्या नेत्यांवर केदार शिंदें नाराज; म्हणाले 'दुर्दैव...'

Kedar Shinde: महाराष्ट्रात 'द केरळ स्टोरी' मोफत दाखवणाऱ्या नेत्यांवर केदार शिंदें नाराज; म्हणाले 'दुर्दैव...'

केदार शिंदे

केदार शिंदे

महाराष्ट्रात बहुचर्चित चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ मोफत दाखवणार असल्याची घोषणा काही राजकीय नेत्यांनी केली होती. आता याविषयीच ‘महाराष्ट्र शाहीर’ चे दिग्दर्शक केदार शिंदेनी ट्विट केलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 08 मे: केदार शिंदे दिग्दर्शित शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत महाराष्ट्र शाहीर या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. येत्या 28 एप्रिलला महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. सिनेमाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला आहे.  सोबतच सिनेमातील गाणी देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहेत. अजय अतुल या संगितकार जोडीनं महाराष्ट्र शाहीर सिनेमाला संगीत दिलं आहे. शाहीर साबळेंचा जीवनप्रवास या चित्रपटातून पाहायला मिळत आहे. अशातच आता केदार शिंदेंच्या एका ट्विटनं सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. त्यांनी ‘ द केरळ स्टोरी' हा चित्रपट महाराष्ट्रात मोफत दाखवण्यावर मत वक्त केलं आहे. कला, समाजप्रबोधन आणि अशात अनेक समाजिक क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे महाराष्ट्राचे लाडके शाहीर अर्थात शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत महाराष्ट्र शाहीर या सिनेमाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेनं वाट पाहत होता. शाहीरांचे नातू केदार शिंदे यांनी महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. तर महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार अभिनेता अंकुश चौधरीनं शाहीरांची भूमिका पडद्यावर अक्षरशः जिवंत केली आहे. काही ठिकाणी चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय पण काही ठिकाणी या सिनेमाला शो मिळत नाहीत आणि मिळाले तर प्रेक्षकांची गर्दी नसल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे महाराष्ट्रात बहुचर्चित चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ मोफत दाखवणार असल्याची घोषणा काही राजकीय नेत्यांनी केली होती. आता याविषयीच केदार शिंदेनी ट्विट केलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

केदार शिंदेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय कि, ‘दुर्दैव… महाराष्ट्रात “केरला स्टोरी” या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “महाराष्ट्र शाहीर” प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?’ केदार शिंदेंनी या ट्विटमधून एका महत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. kedar shinde :‘त्याच्या जीवावर मी पोट भरलं…’ केदार शिंदेच्या करिअरमध्ये हास्यजत्रेमधील ‘या’ अभिनेत्याचा मोठा वाटा केदार शिंदेंचं हे मत काहींना पटलं आहे, पण काही नेटकरी त्यांच्या मताशी असहमती दर्शवत आहेत. दोन्ही चित्रपट वेगळ्या धाटणीचे आणि विषयाचे असून दोन्हींची तुलना करणे चुकीचं असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. ‘शाहीर साबळे ला कुणी विरोध नाही केलेला पण केरला स्टोरी ला विरोध का तुमचा?’,  ‘मी, महाराष्ट्र शाहीर पाहिला, नीलयोग घाटकोपरला आणि केरळ स्टोरीज पण पहाणार आहे. या दोन चित्रपटांची तुलना करणे योग्य नाही.’,  ‘केदार दादा महाराष्ट्र शाहिर ला कोणी विरोध केला नाही किंवा पण एक दुसरा कलाकृती विरोध असण्याचे कारण नाही. काही गोष्टी जनतेपर्यंत पोहचवल्या पाहिजेत.’ अशा कमेंट्स प्रेक्षकांनी या पोस्टवर केल्या आहेत.

जाहिरात

दरम्यान ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाची कथा चार महिलांची आहे ज्या हिंदू असून मुस्लिम बनतात आणि दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होतात. चित्रपटाच्या टीझरमध्ये केरळमधील 32,000 महिलांनी कथितपणे इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यांना दहशतवादी संघटनेने भरती केल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळेच अनेक जण या चित्रपटाला एका विशिष्ट विचारसरणीच्या बाजूने असलेला चित्रपट म्हणत विरोध करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात