मुंबई, 07 मे: सध्या सगळीकडे महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची चर्चा आहे. शाहीर साबळेंच्या जीवनावर आधारित हा सिनेमा चांगली कमाई करताना दिसत आहे. प्रेक्षक या सिनेमाचं तोंडभरून कौतुक करत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलं आहे. त्यांनी या सिनेमातून आपले आजोबा शाहीर साबळेंच जीवन मोठ्या पडद्यावर दाखवण्यात यश मिळवलं आहे. त्यांचं सगळीकडे कौतुक होत असताना त्यांनी मात्र महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम एका कलाकारासाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. काय आहे ही पोस्ट जाणून घ्या. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं जातं. यातील कलाकार देखील महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाले. या कलाकारांनी चांगलंच नाव कमावलं. यातीलच एक कलाकार म्हणजे प्रेक्षकांचा लाडका दादूस. म्हणजेच अभिनेते अरुण कदम. त्यांच्या हटके अंदाजामुळे ते प्रेक्षकांना खळखळून हसवतात. पण तुम्हाला माहितीये का प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे आणि अरुण कदम हे एकमेकांचे खास मित्र आहेत. अगदी संघर्षाच्या काळापासून दोघेही एकमेकांना मैत्रीची साथ देत आहेत. अशातच आता केदार शिंदेंनी आपल्या या मित्रासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
केदार शिंदेनी या पोस्टमध्ये लिहिलंय कि, ‘बरेच दिवस झाले या आमच्या मित्राविषयी @ladkadadus अरूण विषयी लिहायचं होतं. पण जमलंच नाही. महाराष्ट्र शाहीर च्या प्रमोशनसाठी #महाराष्ट्राचीहास्यजत्रा मध्ये गेलो होतो. त्यावेळेच्या हा खास फोटो. अरूण आणि माझी मैत्री १९९० पासून. माझ्या अनंत सुखदुःखात तो महत्वपूर्ण भूमिकेत होता. आमच्या सगळ्यांमध्ये लवकर सेटेल होणारा, घसघशीत कमाई करणारा पहिला अरूणच.’ ‘बोगस कथानकावर प्रचंड पैसा ओतून…’ किरण मानेंनी दिग्दर्शक, निर्मात्यांना दाखवून दिली ‘ती’ चूक त्यांनी पुढे म्हटलंय कि, ‘आर्थिक विवंचना असल्यावर हातात पैसे ठेवणारा अरूणच. कित्येक दिवस मी त्याच्या बीएमसी ॲाफिसात काढल्या आहेत. त्याच्या जीवावर पोट भरलं आहे. आमच्यात वयाने खुप मोठा पण, त्याची मस्करी करताना ते कधीच डोक्यात येत नाही. गण गवळण बतावणी आम्ही दोघं लोकधारामधे सादर करायचो. त्याच्या डोळ्यात दिसायचं की, पुढचं वाक्य तो विसरला आहे. पण अविर्भाव असा असायचा की, समोरचा वाक्य विसरला आहे. आता आम्ही एकत्र फार काम करत नाही. पण त्याची प्रगती पाहून अभिमान वाटतो. आत्ताच्या पिढीतील मुलांसोबत तो त्याच उर्जेने काम करतो हे पाहून मन भरून येतं. खुप शुभेच्छा अरूण.’
केदार शिंदेंची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत असून चाहते विविध कमेंट्स करत आहेत.