माधुरी दीक्षितच्या कार्यक्रमात कोरोनाचा विस्फोट; 18 जणांना झाली लागण 

‘डान्स दिवाने’ (Dance deewane) या रिअलिटी शोमध्ये देखील कोरोनाचा विस्फोट झाला आहे. या शोमधील तब्बल 18 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

‘डान्स दिवाने’ (Dance deewane) या रिअलिटी शोमध्ये देखील कोरोनाचा विस्फोट झाला आहे. या शोमधील तब्बल 18 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

  • Share this:
    मुंबई 31 मार्च: कोरोना विषाणूचं (COVID 19) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) परीक्षकाची भूमिका पार पाडत असलेल्या ‘डान्स दिवाने’ (Dance Deewane) या रिअलिटी शोमध्ये देखील कोरोनाचा विस्फोट झाला आहे. या शोमधील तब्बल 18 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. माधुरी दीक्षितसोबतच डान्सर धर्मेश येलांडे आणि तुषार कालिया या शोमध्ये परिक्षकाची भूमिका साकारत आहे. सध्या डान्स दिवाने या शोचा तीसरा सीझन सुरु आहे. या शोमध्ये बॅकस्टेज काम करणाऱ्या 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. क्रू मेंबर कोरोना संक्रमित झाल्याची बातमी समोर आल्यानंतर, या कार्यक्रमाच्या सेटवर मोठा गोंधळ माजला. काहीसं भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं. त्यामुळं परिक्षकांसह शोमधील सर्व कलाकारांची कोरोना टेस्ट घेण्यात आली आहे. सध्या हे सर्व कलाकार क्वारंटिनमध्ये आहेत. त्यामुळं शो अर्ध्यावरच थांबणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अवश्य पाहा - वाढदिवशी अजय देवगण चाहत्यांना देणार भेट; केली मोठी घोषणा 24 तासांत 5 हजार 185 नव्या रुग्णांची भर पालिकेकडून जारी करण्यात आलेल्या आजच्या आकडेवारीनुसार मुंबईत दिवसभरात 5 हजार 185 नवे करोनाबाधित सापडले असून मुंबईतल्या एकूण बाधितांची संख्या आता 3 लाख 74 हजार 611 इतकी झाली आहे. त्यापैकी 30 हजार 760 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण सध्या मुंबईत आहेत. करोनाचं संकट सुरू झाल्यापासून आजपर्यंत झालेली ही सर्वात मोठी रुग्णवाढ ठरली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत सातत्याने 3 हजारांच्या वर रुग्ण सापडत असताना आज अचानक ही रुग्णवाढ 5 हजारांच्या वर गेली आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published: