मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Madhuri Dixit: 'आईच्या शोकसभेत लिपस्टिक लावून कोण येतं?', VIRAL VIDEO मुळे माधुरी दीक्षित होतेय ट्रोल

Madhuri Dixit: 'आईच्या शोकसभेत लिपस्टिक लावून कोण येतं?', VIRAL VIDEO मुळे माधुरी दीक्षित होतेय ट्रोल

माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित

Madhuri Dixit News: गेल्या काही दिवसांत मनोरंजनसृष्टीतून अनेक वाईट बातम्या ऐकायला मिळाल्या. आधी ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचं आकस्मिक निधन, अभिनेते समीर खक्कर यांचं निधन आणि त्यांनंतर अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आईचं निधन झाल्याचं समोर आलं होतं.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई,18 मार्च- गेल्या काही दिवसांत मनोरंजनसृष्टीतून अनेक वाईट बातम्या ऐकायला मिळाल्या. आधी ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचं आकस्मिक निधन, अभिनेते समीर खक्कर यांचं निधन आणि त्यांनंतर अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आईचं निधन झाल्याचं समोर आलं होतं. आईच्या निधनाने माधुरी दीक्षितच्या आयुष्यात कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आईला शेवटचा निरोप देत अभिनेत्री भावुक झाली होती. दरम्यान आता एका नव्या व्हिडीओमुळे मात्र माधुरीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. पाहूया नेमकं काय घडलंय.

आईच्या जाण्याने माधुरी दीक्षित आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माधुरी दीक्षित आपल्या आईच्या अतिशय जवळ होती. माधुरी प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी आईसोबत शेअर करत असे. या वयातही स्नेहलता दीक्षित नेहमीच हसतमुख चेहऱ्याने आपल्या लेकीसोबत प्रत्येक फोटोत दिसून येत होत्या.माधुरी सतत आपल्या आईसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असे.

(हे वाचा:ज्येष्ठ मराठी अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन; कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास )

दरम्यान नुकतंच स्नेहलता दीक्षित यांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेत नेने परिवारासोबत इंडस्ट्रीतील अनेक लोक सहभागी झाले होते. यावेळी माधुरी दीक्षितहा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अभिनेत्रीला चांगलंच ट्रोल करत आहेत.

इन्स्टंट बॉलिवूडने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी माधुरी दीक्षितवर टीका करायला सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांच्या मते माधुरीने आईच्या शोकसभेत येताना बराच मेकअप केला आहे. डार्क लिपस्टिक लावली आहे. आणि याच कारणामुळे लोक माधुरीवर नाराज झाले आहेत.

या व्हिडिओवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी म्हटलंय, 'आईच्या शोकसभेत इतका मेकअप', तर आणखी एकाने लिहलंय आईच्या शोकसभेत लिपस्टिक लावून यायला काहीच वाटतं नाही का?, तर तिसऱ्या एकाने लिहलंय, या क्षणी तरी सेलिब्रेटींनी ग्लॅमर बाजूला ठेऊन वावरायला हवं'.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, Madhuri dixit