• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • ..अन् रोहित शेट्टीने Madhuri Dixit ला उंदीर पकडायला सांगितलं; धक धक गर्लची झाली अशी अवस्था, पाहा VIDEO

..अन् रोहित शेट्टीने Madhuri Dixit ला उंदीर पकडायला सांगितलं; धक धक गर्लची झाली अशी अवस्था, पाहा VIDEO

रोहित शेट्टीने माधुरी दीक्षितलाही असा एक अजब स्टंट करायला सांगितला की माधुरी अक्षरशः हैराण झाली.

  • Share this:
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : आपलं मधुर हास्य, उत्तम अभिनय आणि नृत्यकौशल्य या बळावर आजही लाखो रसिकांना मोहून टाकणारी बॉलिवूडची (Bollywood) धकधक गर्ल माधुरी दीक्षित (DhakDhak Girl Madhuri Dikshit) सध्या छोट्या पडद्यावर अधिक व्यस्त आहे. कमबॅकनंतर तिला चित्रपटांमध्ये फारसं यश मिळालं नसलं तरीही चित्रपट निर्मितीत तिनं चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर छोट्या पडद्यावरील नृत्याशी संबधित रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून तिनं आपला ठसा उमटवला आहे. सध्या ती कलर्स वाहिनीवरील (Colors Chanel) डान्स दीवानेच्या (Dance Diwane-3) तिसऱ्या पर्वात परीक्षक (judge) आहे. याच कलर्स वाहिनीवर प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) सूत्रधार असलेल्या ‘खतरों के खिलाडी’ (Khataron ke Khiladi) या लोकप्रिय स्टंट रिअ‍ॅलिटी शोचं 11वं पर्व सुरू आहे. कलर्स वाहिनीने या दोन्ही शोजमधील कलाकारांना एकत्र आणून एक नवीन एपिसोड सादर करण्याची कल्पना राबवली आहे. त्यामुळे सध्या ‘डान्स दीवाने’मधील कलाकार ‘खतरों के खिलाडी’मध्ये आपल्या धाडसाची परीक्षा देत आहेत, तर ‘खतरों के खिलाडी’मधील स्पर्धक ‘डान्स दीवाने’मध्ये आपलं नृत्य कौशल्य दर्शवत आहेत. ‘खतरों के खिलाडी’ शोमधील अंतिम फेरीत पोहोचलेले दिव्यांका त्रिपाठी, अर्जुन बिजलानी, राहुल वैद्य, श्वेता तिवारी आणि विशाल आदित्य सिंह ‘डान्स दीवाने’मध्ये आले आहेत, तर ‘डान्स दिवाने’चे स्पर्धक ‘खतरों के खिलाडी’ मध्ये धाडसी कामगिरी करताना दिसले.

राज कुंद्रा 119 पोर्न फिल्म 8.84 कोटींना विकण्याच्या होते तयारीत; बिझनेस प्लॅन

यादरम्यान ‘डान्स दीवाने’ची परीक्षक माधुरी दीक्षितनेही ‘खतरों के खिलाडी’मध्ये हजेरी लावली. त्यावेळी रोहित शेट्टीने माधुरी दीक्षितलाही असा एक अजब स्टंट करायला सांगितला की माधुरी अक्षरशः हैराण झाली. या स्टंटमध्ये माधुरीसमोर दोन बॉक्स ठेवण्यात आले होते, त्यापैकी एका बॉक्समध्ये उंदीर (Mouse) होते आणि दुसरा बॉक्स रिकामा होता. रोहितने माधुरीला एका मिनिटात एक उंदीर उचलून दुसऱ्या बॉक्समध्ये टाकण्यास सांगितलं. उंदीर हातात धरायच्या कल्पनेनेच माधुरी दीक्षित थरथरली, मात्र आपण धाडसी कामातही आपण तितकंच सक्षम असल्याचं माधुरीनं सिद्ध केलं.
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

Deepika Padukone नं विचारलं, घरी कधी येणार?, रणवीर म्हणतो...

तिनं रोहितचं आव्हान स्वीकारलं आणि हा स्टंट यशस्वीपणे पूर्ण केला. याचा एक प्रोमो व्हिडीओ कलर्स टीव्हीने सोशल मीडियावर शेअर केला असून, यात माधुरी हातात उंदीर धरून दुसऱ्या बॉक्समध्ये टाकताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून चाहते माधुरी दीक्षितच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. रविवारी रात्री 8 वाजता हा विशेष भाग प्रसारित होणार आहे.
First published: