• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • राज कुंद्रा 119 पोर्न फिल्म 8.84 कोटींना विकण्याच्या होते तयारीत; काय होता त्यांचा बिझनेस प्लॅन?

राज कुंद्रा 119 पोर्न फिल्म 8.84 कोटींना विकण्याच्या होते तयारीत; काय होता त्यांचा बिझनेस प्लॅन?

तपासादरम्यान पोलिसांना राजच्या कार्यालयातून 24 हार्ड डिस्क सापडल्या होत्या. या हार्ड डिस्कमध्ये एकूण 35 अश्लील चित्रपट होते. आणखीही बरेच चित्रपट आणि PPT दुसऱ्या संगणकामध्ये सापडले.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : राज कुंद्राला (Raj Kundra) पॉर्न (Porn) चित्रपटांमधून कोट्यवधी रुपये कमवायचे होते. पण पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याचा बेकायदेशीर कारभार समोर आला. त्यानं पोलिसांकडून चौकशी सुरू झाल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण तो स्वतःला वाचवू शकला नाही. आता तो तुरुंगात असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध 1500 पानी पुरवणी आरोपपत्र (Raj Kundra Case Chargesheet) सादर केलं आहे. आता या प्रकरणाशी संबंधित अनेक कंगोरे बाहेर येत आहेत. दैनिक भास्करच्या अहवालानुसार, राज कुंद्राकडे 119 चित्रपटांचा संग्रह होता. हे चित्रपट तो 8.84 कोटी रुपयांना विकणार होता. त्यानं दोन वर्षांचा बिझिनेस प्लॅनही बनवला होता. याअंतर्गत त्याला त्याच्या अॅपच्या वापरकर्त्यांची संख्या 3 पट आणि त्याला मिळणारा नफा 8 पट वाढवायचा होता. जेव्हा त्याचं पहिलं अॅप प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरमधून काढून टाकलं गेलं, तेव्हा त्यानं दुसरं अॅप तयार करून घेतलं. मात्र, हे सर्व प्रकरण पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याची ही योजना फसली. हे वाचा - ‘दोस्ती की है, निभानी तो पडेगी’ सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी असं का म्हणाली? राज यांनी पोलीस तपासात सहकार्य केलं नाही. त्याच्या मते त्यानं सर्व डेटा हटवला होता आणि त्याला वाटलं की पोलीस त्याच्यावर फार काही करू शकणार नाहीत. म्हणूनच राज यांनी पोलिसांच्या नोटिशीवर सही केली नाही. त्यानं स्वतःवरील आरोपी अमान्य केले. आरोपपत्रात असं लिहिलं आहे की, कुंद्रा यानं पोलिसांच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर कधीच दिलं नाही. त्यानं फक्त पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. हे वाचा - लज्जास्पद Video : मुस्लीम महिला सहकारीला घरी सोडायला जाणाऱ्या हिंदू बँक अधिकाऱ्याला मारहाण तपासादरम्यान पोलिसांना राजच्या कार्यालयातून 24 हार्ड डिस्क सापडल्या होत्या. या हार्ड डिस्कमध्ये एकूण 35 अश्लील चित्रपट होते. आणखीही बरेच चित्रपट आणि PPT दुसऱ्या संगणकामध्ये सापडले. ज्यामुळं त्याचा संपूर्ण बिझिनेस प्लॅन उघड झाला. या प्रकरणाशी संबंधित इतर आरोपींच्या डिव्हाईसमधून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्यांनी कुंद्रा याची कंपनी विहान एंटरप्राइजच्या काही कर्मचाऱ्यांना साक्षीदार म्हणून सादर केलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: