मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /माधुरीला आठवलं ते गाणं; सरोज खान यांच्या आठवणीनं कोसळलं रडू

माधुरीला आठवलं ते गाणं; सरोज खान यांच्या आठवणीनं कोसळलं रडू

हे नृत्य पाहिल्यानंतर दिवंगत ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका सरोज खान(choreographer Saroj Khan)यांची आठवण माधुरीला आली आणि तिचे डोळे भरून आले.या गाण्याला सरोज खान यांनी कोरिओग्राफ केलं होतं.

हे नृत्य पाहिल्यानंतर दिवंगत ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका सरोज खान(choreographer Saroj Khan)यांची आठवण माधुरीला आली आणि तिचे डोळे भरून आले.या गाण्याला सरोज खान यांनी कोरिओग्राफ केलं होतं.

हे नृत्य पाहिल्यानंतर दिवंगत ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका सरोज खान(choreographer Saroj Khan)यांची आठवण माधुरीला आली आणि तिचे डोळे भरून आले.या गाण्याला सरोज खान यांनी कोरिओग्राफ केलं होतं.

  मुंबई 14 मे: आपलं सौंदर्य, नृत्य आणि अभिनयानं लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या धकधक गर्लचा 15 मे रोजी वाढदिवस असतो. सध्यामाधुरी दीक्षित नेने(Actress Madhuri Dixit Nene)रिअलिटी शो‘डान्स दिवाने’ची (Dance Deewane) जज आहे. माधुरीच्या वाढदिवसानिमित्त या शोमध्ये स्पर्धकांनी तिच्या गाण्यांवर डान्स केला. यावेळी या शोमधील दोन स्पर्धक पल्लवी टोल्ये (Pallavi Tolye) आणि सिझा रॉयने (Siza Roy) माधुरीच्या कलंक चित्रपटातील‘तबाह हो गये’या गाण्यावर नृत्य सादर केले. हे नृत्य पाहिल्यानंतर दिवंगत ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका सरोज खान(choreographer Saroj Khan)यांची आठवण माधुरीला आली आणि तिचे डोळे भरून आले.या गाण्याला सरोज खान यांनी कोरिओग्राफ केलं होतं.

  पल्लवी आणि सिझाचा डान्स पाहून माधुरीच्या डोळयात अश्रू तरळलं. यावेळी भावूक झालेल्या माधुरीनं सांगितलं की सरोज खान यांच्यासोबत तिनी केलेलं हे शेवटचं गाणं होतं. माधुरी म्हणाली, तुम्ही अप्रतिम डान्स केलाय. तुम्हाला डान्स करताना पाहून मला सरोज खान यांना पाहत असल्यासारखं वाटल. मला वाटलं सरोज खान माझ्यासमोर आहेत.‘तबाह हो गये’(Tabah ho gaye)हे माझं त्यांच्यासोबतचं शेवटचं गाणं होतं. माझ्या त्यांच्यासोबत काम करतानाच्या सगळ्या आठवणी तुमच्या डान्समुळे जाग्या झाल्या. मला आठवतंय की सरोज खान या नेहमी त्यांना आवडलेल्या डान्सला 101 रुपयांचं बक्षिस कौतुक म्हणून द्यायच्या. आज त्या नाहीएत मात्र,त्यांच्यातर्फे मी तुम्हाला बक्षिस देतीए,असं म्हणत माधुरीने त्यांना 101 रुपये दिले.

  महाराष्ट्र पोलिसांनी केली कमाल; तक्रार करताच ‘मुलगी झाली हो’मधील अभिनेत्याला लुटणारा गजाआड

  सरोज खान यांचं गेल्यावर्षी तीन जुलैला निधन झालं. त्यांनी माधुरी दीक्षितच्या अनेक गाण्यांना कुरीओग्राफ केलं होतं. सरोज खान यांना तबाह हो गये या गाण्यासाठी बेस्ट कोरिओग्राफरचा अवॉर्ड मिळाला होता. माधुरी सरोज खान यांना गुरू मानते आणि ती त्यांच्या खूप जवळ होती. या शोमध्ये जेव्हा भारतीनं विचारलं की,तुम्हाला सरोज खान यांनी कधी रागावलं होतं का?तेव्हा माधुरी म्हणाली,हो. एकदा तर त्या रागवल्यामुळे मी रडले होते. तेव्हा त्यांनी जवळ घेत का रडतीएस असं विचारलं आणि म्हटलं की आयुष्यात कधीच रडायचं नाही. त्या सेटवर काम करताना मला प्रोत्साहित करायच्या. मला त्यांची खूप आठवण येते, असंही माधुरी म्हणाली. डान्स दिवाने हा शो कलर्स चॅनेलवर प्रसारित होतो.

  First published:

  Tags: Bollywood actress, Madhuri dixit