Home /News /entertainment /

महाराष्ट्र पोलिसांनी केली कमाल; तक्रार करताच ‘मुलगी झाली हो’मधील अभिनेत्याला लुटणारा गजाआड

महाराष्ट्र पोलिसांनी केली कमाल; तक्रार करताच ‘मुलगी झाली हो’मधील अभिनेत्याला लुटणारा गजाआड

'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्याला लुटणारा आरोपी गजाआड; योगेशनं मानले पोलिसांचे आभार

  मुंबई 14 मे: ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेतून नावारुपास आलेल्या अभिनेता योगेश सोहनीला (Yogesh Sohoni) काही दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर लुटण्यात आलं होतं. एका कार चालकानं संमोहित करुन त्याच्याकडून 50 हजार रुपये मिळवले होते. भानावर येताच योगेशनं या प्रकरणी पोलीस तक्रार केली. अन् पोलिसांनी देखील त्याच्या तक्रारीची गांभीर्यानं नोंद घेत चौकशी सुरु केली. (Maharashtra Police) लक्षवेधी बाब म्हणजे तक्रार केल्यानंतर काही दिवसात पोलिसांनी या गुन्हेगाराला पकडलं आहे. योगेशनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. 8 मे रोजी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर ही घटना घडली होती. प्रवास करत असताना एका व्यक्तीनं त्याला अडवलं. त्यानंतर त्याला गाडीच्या बाहेर काढून त्याच्यासोबत दमदाटी केली. त्याला संमोहित केलं अन् 50 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यानं लगेचच पोलीस तक्रार केली. पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रान्चच्या टीमने आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आणि काही दिवसातच आरोपीला गडाआड करण्यात आलं. आरोपीची ओळख पटलेली आहे. कोण म्हणतं सलमानची जादू ओसरली? पहिल्याच दिवशी राधेनं विदेशात केली कोट्यवधींची कमाई
  या व्हिडीओद्वारे योगेशनं महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले आहेत.  या काळात त्याला अनेकांनी फोन करून विचारपूस केली. या सर्वांचेही त्याने आभार मानले आहेत. शिवाय अशी घटना इतर कोणाच्याही बाबतीत घडू नये म्हणून त्यानं सर्वांना सावध केलं आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Crime, Marathi entertainment, Tv actor

  पुढील बातम्या